You are currently viewing तिलारी घाटातून सर्व प्रकारची अवजड वाहने बंद करण्याच्या हालचालींना वेग

तिलारी घाटातून सर्व प्रकारची अवजड वाहने बंद करण्याच्या हालचालींना वेग

तिलारी घाटातून सर्व प्रकारची अवजड वाहने बंद करण्याच्या हालचालींना वेग

दोडामार्ग :

गेल्या काही वर्षापासून तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने ये-जा करु लागली आहेत. हा तिलारी घाट रस्ता अवजड वाहने हाकण्यास योग्य नसताना वाहने घातली जातात यामुळे अपघात वाढले आहेत. वळणावर वाहने अडकून घाट रस्ता वाहतूक बंद होणे, या घटनांमुळे नागरिक वाहन धारकांना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन तिलारी घाटातून सर्व प्रकारची अवजड वाहने कायमस्वरूपी बंद करावी असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण कोल्हापूर यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला होता याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक याना अभिप्राय सादर करायला सांगितला आहे. त्यानुसार चंदगड, आजरा, गडहिंग्लज, पोलीस निरीक्षक यांना तातडीने अभिप्राय सादर करायला सांगितला आहे त्यामुळे अवजड वाहने कायमस्वरूपी बंदी हालचाली सुरू झाल्या आहेत.

दोडामार्ग चंदगड तालुका सीमेवर असलेल्या तिलारी घाट मार्गे गोवा ते दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर पुणे कर्नाटक जवळचा मार्ग असल्याने शेकडो वाहने दररोज ये-जा करतात. याचा फायदा उठवत काही अवजड वाहने या घाटातून उतरली जातात. यामुळे गेल्या काही वर्षांत महिन्यात अवजड वाहनांमुळे अनेक अपघात झाले. काही जणांना जीव गमवावा लागला. वळणावर वाहने अडकून पंधरा ते वीस तास वाहतूक बंद होणे, पर्यायी मार्ग नसल्याने गैरसोय होणे ही गंभीर बाब होती. यामुळे या तिलारी घाटातून सर्व प्रकारची अवजड वाहने बंद करावी, अशी मागणी चंदगड बांधकाम विभाग यांनी कार्यकारी अभियंता कोल्हापूर दक्षिण विभाग यांना कळविले होते. तसा प्रस्ताव गेल्या वर्षी सादर केला होता. चालू वर्षात देखील गेल्या मे महिन्यात अपघात होणे, वाहन अडकून घाट बंद होणे घटना घडल्या होत्या. अखेर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन तातडीने कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कळविले या नंतर पोलीस अधीक्षक कार्यालय येथून १ जून रोजीच आजरा, गडहिंग्लज, चंदगड, पोलीस निरीक्षक यांना पञ पाठवून तिलारी घाटातील सर्व प्रकारची अवजड वाहने कायमस्वरूपी बंदी करण्याबाबत अभिप्राय सादर करायला सांगितला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा