You are currently viewing राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी  प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन…

राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन…

मुंबई

जलसंसाधननदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवनमंत्रालयभारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासनस्थानिक स्वराज्य संस्थाप्रसार माध्यम प्रतिनिधीशाळाउद्योगअशासकीय संघटना अशा घटकांकडून विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार 2020’ करीता 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जनजागृती होणे देखील आवश्यक आहे. म्हणून विविध क्षेत्रात जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो.

          त्यानुसार यावर्षी 3 रा राष्ट्रीय जल पुरस्कार, 2020 विविध श्रेण्यांमध्ये देण्याचे प्रस्तावित आहे. यात उत्कृष्ट राज्यजिल्हानगरपरिषदग्रामपंचायतशाळामोठेमध्यम व लघु उद्योगजल नियमन प्राधिकरणजल योद्धाअशासकीय संघटनापाणी वापर संस्थादूरचित्रवाहिनी कार्यक्रमहिंदी/ मराठी/ इंग्रजी वर्तमानपत्रअशा एकुण 11 श्रेणींमध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती/ संस्था/ कंपनी यांनी परिपूर्ण नामांकने/ प्रस्ताव/ दि. 10 फेब्रुवारी, 2021 रोजीपर्यंत https://mygov.in या वेबसाईटवर किंवा nationalwaterawards@gmail.com या ई-मेल वर केवळ ऑनलाईन सादर करावेतअसे आवाहन र.ग.परातेउपसचिवलाक्षेवि (आस्था)जलसंपदा विभागमंत्रालययांनी केले आहे.

            याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क  करावा, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा