You are currently viewing चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक

चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक

चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक

 सिंधुदुर्गनगरी 

चारधाम यात्रा 2024 च्या सुरुवातीच्या आठवड्यात यात्रेकरूची अभूतपूर्व गर्दी आपण अनुभवत आहोत. या वर्षी उत्तराखंडमधील पवित्र चारधामला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

धाम येथील दर्शनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी उत्तराखंड शासनाने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी अनिवार्य आहे आणि भक्तांनी चारधाम यात्रा 2024 साठी https://registrationandtouristcare.uk.gov.in  वर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली असेल त्या तारखेलाच धाम येथे दर्शनाची परवानगी असेल.

वृद्ध आणि पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थिती असलेल्यांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, उत्तराखंड सरकार यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, जे https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory  वर उपलब्ध आहेत.

उत्तराखंड राज्याच्या मुख्य सचिवांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी आवश्यक असल्याचे कळविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे भाविक चारधाम यात्रेसाठी जाणार आहेत त्यांनी वरील लिंकवर सर्व माहिती भरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा