जप्त केलेला डंपर चोरी केल्याप्रकरणी आरोंद्यातील एक निर्दोष…
सावंतवाडी
अवैध वाहतूक प्रकरणी जप्त करण्यात आलेला डंपर तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून चोरी केल्याप्रकरणी आरोंदा येथील चालक कृष्णा कोरगावकर याची येथील न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. याकामी ॲड अनिल निरवडेकर, अशोक जाधव, गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.
ही घटना ५ मार्च २०२१ ला आरोंदा येथे घडली होती. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना संबंधित डंपर चालक आढळून आला होता. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करून हा डंपर जप्त करण्यात आला होता. त्यानंतर तो डंपर सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसरात उभा करून ठेवण्यात आला होता . मात्र त्याच रात्री तो चोरीला गेला होता. याबाबत महसूल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.मात्र चौकशी दरम्यान संबंधित डंपर हा मालक कोरगावकर यांनी चोरल्याचे उघड झाले होते.
त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. त्या प्रकरणी न्यायालयाकडून १५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सबळ पुराव्या अभावी कोरगावकर याची निर्दोष मुक्तता करण्यात आली या कामी ॲड अनिल निरवडेकर, अशोक जाधव, गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.