*अनिल शिंगाडे यांना कन्याकुमारी पुरस्कार प्रदानअनिल शिंगाडे यांना कन्याकुमारी येथे दिव्यांग सेवा पुरस्कार प्रदान*
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांना दिनांक 26/05/ 2024 रोजी कन्याकुमारी स्वामी विवेकानंद केंद्र येथे हुतात्मा बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था कराड या संस्थेच्या वतीने दिव्यांग सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनिल शिंगाडे हे गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.अनिल शिंगाडे यांना असे अनेक पुरस्कार प्राप्त असून हा पुरस्कार नव्याने मिळाला असून त्यांनी आनंद व्यक्त केला.
हा पुरस्कार मला मिळाला नसून माझ्या कार्याला व दिव्यांग सेवेला मिळाला आहे.यापुढेही असेच कार्य दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र करणार असे मत व्यक्त केले. विजय कुडाळकर,अरविंद जाधव,शामसुंदर लोट यांनी सहभाग घेतला होता.या सर्वांच्या वतीने आयोजकांचे आभार मानले.