You are currently viewing कोलगावची सुकन्या शिवानी मेस्त्री मर्चंट नेव्हीत ‘ईटीओ ऑफिसर’

कोलगावची सुकन्या शिवानी मेस्त्री मर्चंट नेव्हीत ‘ईटीओ ऑफिसर’

कोलगावची सुकन्या शिवानी मेस्त्री मर्चंट नेव्हीत ‘ईटीओ ऑफिसर’

देशभरातून निवडलेल्या ४० मुलांमधून निवड

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव गावची सुकन्या शिवानी लवू मेस्त्री हीची भारतीय मर्चंट नेव्हीत इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसरपदी नियुक्ती झाली आहे. देशभरातून निवड झालेल्या ४० मुलांमधून तिची या पदासाठी निवड झाली आहे‌. या यशाबद्दल सर्वस्तरातून शिवानीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.

आई-वडीलांचा पाठिंबा मिळाल्याने हे यश संपादन करता आलं. पहिल्या महिला इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर रोमिता बुंदेला व शिपवर कार्यरत महिला ईटीओ यांच्याकडून मला प्रेरणा मिळते अशी भावना शिवानी मेस्त्री हीने यावेळी व्यक्त केली.

शिवानी मेस्त्री ही मूळ कोलगांवची आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोलगाव नंबर १ येथे तीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. तर हायस्कूल व कॉलेज शिक्षण राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधून घेतले. सिनिअर कॉलेजला मालवण येथे डिप्लोमा व ए.सी.पाटील सीईओ नवी मुंबई येथून इलेक्ट्रीकल इंजिनिअर पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने मर्चंट नेव्ही या कॉलेजची प्रवेश परिक्षा दिली. यामध्ये देशभरातून आलेल्या ४० मुलांमधून तीची निवड करण्यात आली. चार महिन्यांचा प्री‌-सी ईटीओ कोर्स पूर्ण केला. विशेष म्हणजे यामध्ये ती एकटीच महिला होती. मुलाखतीनंतर इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसरपदी तिची निवड झाली. शिवानीचे कुटूंब हे सावंतवाडीच असून आई, वडील व मोठी बहीण असा तिचा परिवार आहे‌.

 

या क्षेत्रात जाण्यासाठी माझ्या चुलत भावानं मला प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला आई-वडिलांना भीती होती, काळजी होती. म्हणून, विरोध ही झाला होता. पण, या क्षेत्रात जाण्याची माझी जिद्द होती. त्यामुळे मी आई- वडीलांना विश्वासात घेऊन समजावलं. त्यांनंतर त्यांचाही पूर्ण पाठिंबा मला मिळाला. म्हणूनच आज हे यश संपादन करता आल्याच ती आवर्जून सांगते‌‌. तर पहिल्या महिला इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर रोमिता बुंदेला आणि शिपवर कार्यरत असणाऱ्या सर्व महिला ईटीओ यांच्याकडून मला प्रेरणा मिळते अशी भावना शिवानी मेस्त्री हीने व्यक्त केली आहे. तीच्या या उत्तुंग भरारीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सावंतवाडीची कन्या मर्चंट नेव्हीत इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर झाल्यानं सावंतवाडीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा