दोडामार्ग वीज ग्राहक बैठकीत ग्राहकांचे अधिका-यांना आवाहन
दोडामार्ग :
जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हा व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनचाफा हाॅटेल दोडामार्ग येथे वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी अनेक समस्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस जिल्हा वीजग्राहक संघटना उपाध्यक्ष अॅड. नंदन वेंगुर्लेकर, व्यापारी संघ माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, कुडाळ कार्यकारी अभियंता कार्यालय अधिकारी श्री.वाघमोडे, दोडामार्ग उपअभियंता श्री.नलावडे, दोडामार्ग वीजग्राहक संघटना अध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, दोडामार्ग व्यापारी अध्यक्ष सागर शिरसाट, बाबुराव धुरी, एकनाथ नाडकर्णी, राजेंद्र म्हापसेकर, कृतिका सुतार, मदन राणे, चंदन गांवकर, रामचंद्र सावंत, संजय देसाई, प्रसाद सावंत, जयवंत गवस, ओम देसाई, राजेश फुलारी, आर्शिवाद मणेरीकर, दिलीप देसाई, राधाकृष्ण म्हापसेकर, अरुण धर्णे, यशवंत गाड, अजित देसाई, ज्ञानेश मोरजकर, सगुण गवस, सागर कर्पे, भालचंद्र उमये, संदेश राणे, संदेश गवस, संदेश देसाई आदी उपस्थित होते.
सर्व प्रथम वैयक्तिक समस्यांचे निरसन करण्यात आले. यावेळी काहिंनी लेखी तक्रार यापूर्वी दाखल केलेले त्यांच्याही समस्यांचे निवारण करण्यात आले. पावसाळ्याच्या धर्तीवर तालुक्यातील सर्व लाईन वरील झाडेझुडपे साफसफाई करण्यात यावी अशी मागणी राजेंद्र म्हापसेकर यांनी करत अतिरिक्त विद्युत खांब व कर्मचारी तैनात करा अशा सूचना दिल्या. साटेली-भेडशी येथे वीज अभियंता चव्हाण यांची बदली करा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असे बाबुराव धुरी यांनी इशारा दिला. महालक्ष्मी विद्युत कंपनीचा करार तात्काळ करुन विद्युत पुरवठा सुरळीत ठेवा अशा सूचना यावेळी वीज ग्राहकांनी दिल्या. तर इन्सुली सबडिव्हीजन दोडामार्ग येथेच उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा अशी सूचना जिल्हा उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांनी मांडली. चंदन गांवकर यांनी केळीचे टेंब व म्हावळकरवाडी यांचा विद्युत पुरवठा नगरपंचायत क्षेत्रातूनच एकञित व्हावा अशी मागणी केली. यावेळी ६ जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वाढीव वीजबीलबाबत वीज ग्राहकांच्या समस्या असल्यास दोडामार्ग वीज कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.