अवैध धंद्यांवर कारवाई करा…
भाजपच्या शिष्टमंडळाची भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी..
कणकवली
कणकवली तालुक्यात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. अवैध दारू, अमलीपदार्थ तालुक्यात ठिकठिकाणी खुलेआम विक्री सुरु आहे. अवैध दारु व अमलीपदार्थांची खुलेआम विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अमलीपदार्थांची विक्री गावगावांमध्ये खुलेआम सुरु आहे. याबाबत पोलिसांनी कडक पाऊले उचलावीत, अशी भाजपच्या शिष्टमंडळाने माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, वागदे सरपंच संदीप सावंत, साकेडी उपसरपंच प्रज्ज्वल वर्दम, माजी नगरसेवक शिशिर परूळेकर, युवा मोर्चा पदाधिकारी संतोष उर्फ पप्पू पुजारे, सुभाष मालंडकर, समीर प्रभूगांवकर, विजय चिंदरकर, सिद्धेश तळगांवकर, बाबू घाडीगांवकर, नितीन राणे, लवू परब, शिवा राणे, महेश तेली, आशिष राणे, अभय गांवकर, सागर पवार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारु व अंमलीपदार्थांची राजरोजपणे विक्री सुरु आहे. पोलीस केवळ आकडेवारी दाखवण्यासाठी एखाद दुसरी कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. अवैध धंद्यांबरोबरच मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी असे सर्वच प्रकार राजरोजपणे सुरु असतानाही पोलीस यंत्रणा त्याकडे डोळेझाक करीत आहे. अवैध धद्यांमुळे गैरप्रकार वाढण्याची शक्यता असून पोलिसांनी अवैध धंदे रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचवाली, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची पुढील दिशा ठरवावी लागेल, असा इशारा देण्यात आला. अवैध दारू व अमलीपदार्थ विक्री करणार्यांकडे पोलीस कधीच दुर्लक्ष करत नाहीत. कुठूनही माहिती मिळाली की आम्ही कारवाई करतो. तुम्ही सुद्धा माहिती दिली तर कारवाई केली जाईल, असे तडवी यांनी सांगितले.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*