You are currently viewing माझं कॅमेर्‍यासोबतच जगणं..

माझं कॅमेर्‍यासोबतच जगणं..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझं कॅमेर्‍यासोबतच जगणं..!!*

चौदावे…!!

 

अविरत सेवेचा झरा

माझा कॅमेरा वाहतो

नेत्रदिपक भौतिक समृध्दी

माझ्या जगण्याला देतो..

 

मनमुराद भुलवण खेच…तू

गुलाबांना घरोघरी पोहचवं..तू

परतीचे दोर कापलेस…..तू

राॅबनहुडी स्वप्नरंजन दे….तू

 

कामक्रोध लोभमद दंभमत्सर

कॅमेराला ठाऊक नाही

असमर्थ असहाय अवस्था

लेन्समधून दिसत नाही..

 

अंतरी नेत्रसंस्काराची श्रीमंती

व्यक्तीमत्वात तुझ्या बिंबवली

निकोप निरोगी विश्वासता

कॅमेर्‍यासोबतच तुझ्यात भिनली

 

धर्मवर्ण जातपंथ प्रांतभाषा

भेदाभेदअमंगल फिल्टर झाले

मानवनिर्मित सारे मतभेद

कॅमेर्‍याने डिलीट केले….

 

तुझं कॅमेर्‍यासोबतच जगणं

प्रेमभाव आपलेपणा जपतो

व्यक्तीपरत्वे माणसांचा जिव्हाळा

कॅमेराच जिवंत करतो…

 

स्माईल प्लीज…..आवाज देताच

आकांक्षाचे अवकाश मोकाट सोडतो

एकमेकाजवळ अजून या..सांगताच

सन्मान राष्ट्रीय एकात्मतेचा करतो..

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा