*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”यौवन”*
हे यौवना येना पुन्हा परतून
हृद्य आठवणी करितात बेचैनIIधृII
अलवार स्पर्श मिठीने येती स्पंदन
कळावयाचे सारे शब्दा वाचून
स्पर्श होता तुझा विसरायचे भानII1II
होता नजरा नजर पाझरे लोचन
हात हाती घेता हलके होई मन
आधार विश्वास वाटे मन प्रसन्नII2II
जलाशयाचे तिरी सुखद भेटणं
एकांती काठावर जळांत खेळणं
प्रेम आठवणींत रुंजी घालते मनII3II
मी वाजवीत होतो बीन प्रेम गीत
आकाशी विहारायचे पंख लावून
चंद्र चांदण्यात सैर सुखावे मनII4II
श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.