You are currently viewing शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कुडाळ / पणदूर :

 

वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा या प्रशालेतून मार्च २०२४ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेत १५६ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी १५६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा १००% निकाल लागला आहे. या निकालात कु. पूनम दळवी हिने विशेष प्राविण्य मिळवत संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून एकूण गुण ४७९ (९९.४०%) प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच पूनम दळवी ह्या विद्यार्थिनीने ९९.४०% मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तर द्वितीय क्रमांक कु. पार्थ चिंदरकर गुण ४७४ (९४.८०%), तृतीय क्रमांक कु.मंथन राऊळ गुण ४६८ (९३ %), चौथा क्रमांक कु. ईशा परब गुण ४६३ (९२.६०%), पाचवा क्रमांक कु. कुणाल चव्हाण गुण ४६२ (९२.४०%), प्राप्त केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आप्पासाहेब गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, संस्था पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा