You are currently viewing शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशकामी वेळेत दाखले मिळावेत

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशकामी वेळेत दाखले मिळावेत

*शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशकामी वेळेत दाखले मिळावेत

*:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्याची तहसीलदारांकडे मागणी.*

*सेतु सुविधा सुलभ होण्याकरिता मनसे कुडाळ तालुका आग्रही.*

कुडाळ
आत्ताच दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले असल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले उदा.जातीचे दाखले, नॉन क्रिमिनल, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व याप्रकारे अनेक दाखले मिळविण्यासाठी कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण दुर्गम भागातून अनेक मुले व पालक हे येत असतात अशावेळी बरेचदा तहसील कार्यालय इंटरनेट किंवा सर्वर डाऊन अशा प्रकारच्या कारणांसोबत सेतू केंद्रातून अरे रावीची उत्तरे देण्यात येतात अशावेळी पालक व मुलांना होणारा त्रास कमी होण्यासाठी व शैक्षणिक दाखले वेळेत व सुलभतेने मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष हेमंत जाधव व तालुका अध्यक्ष गजानन राऊळ यांनी निवेदन दिले. सोबत जिल्हा धीरज परब उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, जगन्नाथ गावडे, विष्णू मस्के,दिपक गंगावणे, अतुल पांगुळ,सोहम कुंभार उपस्थित होते.
मनसेने केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कुडाळ तहसीलदार श्री.विरसिंग वसावे यांनी आजच सेतू सुविधा केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन जनसामान्यांना होणारा त्रास कमी करण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा