*काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.स्वाती गोखले लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बेधुंद सुवास*
उन्हाळ्याच्या दिवसातील
मोगऱ्याचा सहवास
अंगणात परिमळलेला
बेधुंद तो सुवास…
कसा बरं हा मोगरा
वेड लावतो सुगंधाचे
मन जाते मोहून
शुभ्र फूल तयाचे…
हाताच्या ओंजळीत कसा
भरून राहिलेल्या फुलांचा
दरवळत राहतो सुवास
अनोख्या नाजूक मोगऱ्याचा…
देवाला वाहिलेल्या फुलांनी
भरून जातो गाभारा
गंधाळलेल्या परिमळाने
हवाहवासा वाटतो मोगरा…
कळ्यांनी बहरताच
मोगरा फुलला
पानात दडून बसता
सुगंध सुटला…
गजरा माळताच डोक्यात
मोगरा दिसे मोहक
धवल फुलांची माला
नाजूक पण मादक…
मोगऱ्याच्या नाजूक कळ्या
हळूच पाहून हसल्या
मनात जाऊन माझ्या
रूतूनच की हो बसल्या…
नाजूक मोगऱ्याचा असा
सुंदर, सुगंधी सहवास
मन भरून हुंगावा
इतका आवडतो वास…
सौ.स्वाती गोखले.
पुणे.