You are currently viewing कुडाळ कविलकाटे येथील रमेश जळवी यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत..

कुडाळ कविलकाटे येथील रमेश जळवी यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत..

कुडाळ कविलकाटे येथील रमेश जळवी यांना शिवसेनेकडून आर्थिक मदत..

जिल्हा संघटक रुपेश पावसकर,तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचा पुढाकार.

कुडाळ

कुडाळ कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर गुरुवारी २३ मे.रोजी रात्री वादळी वारा पाऊस यात रमेश जळवी यांच्या घरावर भेलड्यामाड चे झाड आणि कोकम झाड अशी दोन झाडे पडून जळवी यांच्या घराचे मोठे नुकसान झाले होते.याची खबर कविलकाटे येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समील जळवी यांनी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणि शिवसेना तालुका प्रमुख अरविंद करलकर यांच्या कानावर घालून त्यांना आर्थिक मदत शिवसेना पक्षाकडून मिळावी अशी चर्चा केली होती.यावर जिल्हा संघटक रुपेश पावसकर आणी तालुका प्रमुख अरविंद करलकर यांनी यावर तातडीने निर्णय घेत आज रविवारी २६ मे.२०२४ रोजी कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील श्री.रमेश जळवी यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत सुपूर्द केली. त्यावेळी जिल्हा संघटक रुपेश पावस्कर तालुकाध्यक्ष संजय करालकर पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सामील जळवी दळवी कुटुंबीय उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा