You are currently viewing गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल – प्रभाकर हडकर 

गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल – प्रभाकर हडकर 

गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेईल – प्रभाकर हडकर

कणकवली

तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांचे आचार व विचार तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजे. गौतम बुद्ध यांचा शांतीचा मार्ग सर्वांना सुखाकडे नेणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा शांतीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन प्रभाकर हडकर यांनी केले.
बौद्ध विकास मंडळातर्फे मसुरे येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित केला होता याप्रसंगी श्री. हडकर बोलत होते.

यावेळी मसुरे बौद्ध विकास मंडळाच्या ग्रामीण शाखेचे अध्यक्षा सुगंधा तांबे, मुंबई मंडळाचे सचिव संतोष तांबे, अनिल तांबे, बाबुराव तांबे, मिलिंद तांबे, राजेंद्र तांबे, दीपक तांबे, मुरलीधर तांबे, सागर तांबे, गणेश तांबे, प्रमिल तांबे, महिला मंडळाच्या अध्यक्षा वेदिका तांबे, मृणाल तांबे, अवंतिका तांबे, मेनका तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
हडकर म्हणाले, जगामध्ये हिंसेचे प्रकार वाढत असून हे प्रकार गौतम बुद्ध यांचा धम्मच रोखू शकेल. गौतम बुद्ध यांचे सम्यक विचार व आचार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारवेत, असे आवाहन त्यांनी केले. हा समतेचा जागर जागृत ठेवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. यासाठी धम्माचे आचरण योग्य होणे आवश्यक आहे तरच खर्‍या अर्थाने बौद्ध धर्माचा प्रचार आपल्याकडून होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांचा गौरव करण्यात आला. बीएमसीमधून सेवानिवृत्त झालेले मुरलीधर तांबे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे केले. आभार सागर तांबे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा