*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*त्रैलोक्याचा स्वामी*
राम त्रैलोक्याचा स्वामी
अंतर्यामी आठवावा
राम नाम जपताना
नित्य मनी साठवावा….१
राम नाम एक मार्ग
जेव्हा अडतात मूढ
रामनामे ज्ञानार्जन
होई आकलन गूढ……२
कुणा पामराची नौका
तुझ्या वाचून अडते
तुझ्या कृपेमुळे रामा
तिचे भविष्य घडते…..३
ध्यास चहुकडे तुझा
तुला घालतो साकडे
आयुष्याच्या पदपथी
नको पाऊल वाकडे….४
मोह मद माया आदि
दुःख सारे शांतवाया
रामकृपा प्रासादिक
व्हावी नित्य रामराया …..५
जप राम नाम ओठी
भवसिंधु होई पार
सोडू नको सदाचार
हेचि जीवनाचे सार….६
©️®️ डॉ मानसी पाटील