*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फतवा….फतवा….!!*
दोरीवरच्या उड्या मारत
वा-यानं कुस बदलली
फुलांना लावलं गायनाला
स्वतःच रचल्या चाली..
प्रेमी खट्याळ वारा
दावी मोहक नखरा
फुलांनो तुम्हीच लपवा
तुमचा नाजूक चेहरा..
रंग फुलांच्या गालावरचे
लाजून उडू लागले
गालावरच्या खळ्या दिसताच
रंगलावण्यात आरक्त झाले..
देवराईत फुलांच्या ताटव्यांनी
काढला अनायस फतवा
आमच्याकडे डोळे रोखून
वेड्यागत बघू नका..
संवाद वा-याशीच करा
स्वतःच लावा चाली
तहाविना सारकांही हारा
गात राहा गाणी..
नाहीतर दुष्ट वारा
दाविल त्याचा तोरा
सौभाग्य कपाळी लादून
देईल तुमच्यावर पहारा..
बाबा ठाकूर धन्यवाद