निवडणूक बिनविरोध
सावंतवाडी
सावंतवाडी नगरपालिकेतील सभापतींचा कार्यकाल संपुष्टात आल्यामुळे या पदांसाठी आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत गतवर्षीप्रमाणे भाजपचीच सरशी झाली. भाजप व सेनेचे नऊ – नऊ असे समसमान बलाबल असतानाही भाजपने दोन पदे मिळवली. तर सेनेची केवळ एकाच सभापदीपदावर बोळवण करण्यात आली. ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. यात पालिकेच्या आरोग्य क्रीडा सभापतीपदी भाजपचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर, उद्यान पाणीपुरवठा सभापतीपदी उदय नाईक तर महिला बालकल्याण सभापतीपदासाठी सेनेच्या नगरसेविका दिपाली सावंत यांची निवड झाली. तसेच महिला बालकल्याण उपसभापतीपद सेनेच्या भारती मोरे यांना देण्यात आले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापतींचे नगराध्यक्ष संजू परब यांनी अभिनंदन केले. यावेळी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, ॲड. अनिल निरवडेकर, विशाल परब, उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, गटनेते राजू बेग, नगरसेवक परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, नासिर शेख, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, समृद्धी विरनोडकर, दीपाली भालेकर, शुभांगी सुकी, बंटी पुरोहित, विनोद सावंत परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते.