बुलढाणा :
बुलढाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक कवी माननीय सुदामजी खरे यांना संजीवनी संस्थेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार सोहळा दिनांक ६ जून रोजी केळवद ता.चिखली येथे संपन्न होणार आहे.
संजीवनी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक संस्था केळवद यांच्या वतीने दरवर्षी ‘सामुहिक सर्व जातीय’ लग्न सोहळ्याचे आयोजन गेल्या पंधरा वर्षापासून सतत होत आहे. यावर्षीही सदर सर्व जातीय लग्न सोहळ्याचे आयोजन दिनांक ६ जून रोजी करण्यात आले असून या सोहळ्यात विविध सर्व धर्मीय ‘जातीय लग्न सोहळा’ आयोजित केला आहे. त्याच बरोबर समाजातील विविध क्षेत्रातील ‘उल्लेखनिय’ काम करणाऱ्या व्यक्तींचा ‘सन्मान व पुरस्कार’ सुद्धा त्या ठिकाणी होणार त्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने डॉ. निवृत्ती भाऊ जाधव संजीवनी संस्थेचे अध्यक्ष यांनी यावर्षी बुलढाणा येथील साहित्य कवी सुदामजी खरे यांची ‘जीवनगौरव पुरस्कार’ साठी निवड केली आहे.
विस्तार अधिकारी राहीलेले सुदामजी खरे हे ‘कला अकादमी व अस्मितादर्श सुध्दा चे सदस्य’ आहेत. तसेच ‘आंबेडकरी साहित्य अकादमी’ बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी सायकल सफर, जंगल सफर – क्रिडा स्पर्धा, श्रमदान शिबीरे, ‘सांस्कृतिक कार्यकम, कवी संमेलने, प्रबोधने, बाल आरोग्य शिबीरे, महिला शिवणयंत्र शिबीर, वृक्षारोपन आदी ‘समाज उपयोगी विधायक कार्य’ केले आहे . त्यांना वाचन गायन, भाषण, संवाद, काव्यरचना याची आवड असून त्यांना या पूर्वीच ‘महात्मा ज्योतीबा फुले समाज गौरव पुरस्कार’ तसेच ‘काव्य स्पर्धा युवा पुरस्कार’ ‘छत्रपती शिवाजी समाज सेवक पुरस्कार’ ‘उत्कृष्ट कार्यकर्ते पुरस्कार’ आदी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करणे व कर्तुत्वान व्यक्तींचा गुणगौरव करणे आदी कार्य त्यांचे सुरु आहे. मनमिळावू आनंद यात्री शिक्षक ते शिक्षण विस्तार अधिकारी या प्रवासात त्यांनी सतत काव्य लिखान करून ‘चेतनांकुर’ काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. तर त्यांच्या जीवन प्रवासावर ‘आनंद यात्री सुदाम खरे’ हा गौरव ग्रंथ कवी रविंद्र साळवे संपादीत केला आहे. जीवनात ‘अनेक चढउतार ‘ पार करून खडतर आयुष्यात त्यांनी ‘नंदनवन’ फुलविले आहे . त्यांच्या या पुरस्कार निवडीपुढे साहित्य वर्तुळात मित्रमंडळात आनंद व्यक्त होत असून अभिनंदन वर्षाव होत आहे.