You are currently viewing बालकांच्या लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियात दाखल गुन्ह्यात प्रसार माध्यमांनी फिर्यादी व पिडीत यांचा तपशिल उघड करु नये..

बालकांच्या लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियात दाखल गुन्ह्यात प्रसार माध्यमांनी फिर्यादी व पिडीत यांचा तपशिल उघड करु नये..

– अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील

सिंधुदुर्गनगरी 

बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 23 नुसार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत फिर्यादी व पिडीत यांचा तपशिल प्रसारमाध्यमांनी उघड करुन नये असे आवाहन, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी केले आहे.

            बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 23 मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकांचे नाव, छायाचित्र, कौंटुबिक तपशिल, शाळा, शेजारी किंवा ज्यामुळे बालकाची ओळख उघड होईल असा अन्य तपशिल यासह बालकाची ओळख उघड होणार नाही असे नमूद आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी संबंधितांचा तपशिल उघड करुन नये. असे आवाहन, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा