जळगावज्ञ :
जळगाव जामोद येथिल कवी व समाज सुधारक चंद्रकात गजानन शिंदे यांना यावर्षीचा संजीवनी संस्थेचा मानाचा ‘समाज सुधारक’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दि ६ जून रोजी वितरण होणार आहे.
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजीवनी बहुउदे. शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि. बुलढाणा याच्या वतीने दरवर्षी सर्व जातीय सामुहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. संस्था अध्यक्ष डॉ. निवृत्ती भाऊ जाधव हे आयोजन करून समाजातील ‘होतकरी कष्टकरी’ आणि समाजउपयोगी विधायक कार्य करणार्या व्यक्तीचा पाठीवर थाप म्हणून सत्कार पुरस्काराचे आयोजनही याच सोहळ्यात करीत असते. या वर्षीही आयोजन असून त्यात जळगाव जामोदचे कवी साहित्यिक व समाज कार्य करणारे चंद्रकात गजानन शिंदे यांची निवड ‘संजीवनी समाज सुधारक’ या पुरस्कारसाठी झाली आहे. संस्थेव्दारा घोषणा करण्यात आली आहे. सदर पुरस्कार हा केळवद ता चिखली येथे सामुहिक सोहळ्यात उपस्थित मानवरांच्या शुभ हस्ते वितरीत होणार आहे. राष्ट्रीय सचिव शेतमजूर कामगार संघटना ‘जिल्हा सरचिटणीस दिव्यांग आघाडी भाजपा’ विदर्भ सचिव भ्रष्टाचार निर्मुलन समिती राज्य संघटना ‘उज्जैनकर फाऊंडेशन जिल्हा सदस्य’ आणि ‘जन संघर्ष शेतमजूर’ आदी संघटनेच्या माध्यमातून चंद्रकांत शिंदे कार्य करीत आहे. कोळी बांधव ‘कामगार वर्ग’ शेतकरी वर्ग तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष कार्य केले असून चंद्रकात हे कवी आणि साहित्यिक, गायक सुद्धा आहेत. त्यांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काव्य पुरस्कारही मिळाले आहेत. लॉक डावून सारख्या बिकट व परिस्थितित त्यानी घरोघरी शिधा धान्य मिळवून देण्यास विशेष प्रयत्न केले आहेत. ते उत्कृष्ठ आर्टिस्ट सुद्धा आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जिल्हाभरातून चाहत्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.