*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*
फोंडाघाट
जिल्हा पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग या केंद्राच्या माध्यमातून आज दिनांक 21/05/2024 रोजी फोंडाघाट ग्रामपंचायतच्या सभागृहात दिव्यांगांचा विभागवार मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्याला सुमारे 80 पेक्षा जास्त दिव्यांग बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संजना आग्रे ,ग्रामसेवक कोलते , जिल्हा समन्वयक श्री.अनिल शिंगाडे तसेच प्रणाली दळवी,अमिषा मेस्त्री,आरती पडेलकर आदि मान्यवर उपस्थित होते.या सर्वांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच विवेकानंद नेत्रालय यांच्या माध्यमातून दिव्यांग व त्यांच्या पालकांची नेत्र तपासणी करून त्यांना शासकीय व निमशासकीय या योजनांची तसेच दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य विषयी माहिती आणि udid व रेल्वेपास यांची माहिती देण्यात आली.तसेच उपस्थितांना दिव्यांग बांधवांना सरपंच व ग्रामसेवक यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे प्रणाली दळवी यांनी जाहीर केले.