वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के
आचिर्णे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी निरजा प्रदीप मांजरेकर हिने ८६.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम
वैभववाडी
मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे. तालुक्यातून एकूण ४०२ विद्यार्थी या परीक्षेस बसले होते. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील आचिर्णे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी कुमारी निरजा प्रदीप मांजरेकर हिने ८६.१७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. तर कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी चे विद्यार्थी कुमार प्रदीप प्रवीण मोरे ८५.६७ टक्के व शुभम दिलीप परब ८४.५० टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.
येथील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या विद्यालयातून तिन्ही तिने शाखेतून २५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत या कनिष्ठ महाविद्यालयाचा १००टक्के निकाल लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतून यश बाबू शेळके ७७ टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. तर प्रीती विजय सावंत ७६ टक्के गुण व रिया रवींद्र मोरे ७४.५० टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे.
याच महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून १०२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेतून प्रफुल्ल प्रवीण मोरे त्याने 85.67 टक्के गुण मिळवून कनिष्ठ महा विद्यालयात प्रथम तर तालुक्यात द्वितीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. शुभम दिलीप परब 84.50% गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात द्वितीय तर तालुक्यात तृतीय येण्याचा बहुमान मिळवला आहे. या शाखेतून वैष्णवी अनंत करवंजे हिने 83.67% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून शंभर विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विज्ञान शाखेत हर्ष सुरेश सुतार याने 82.83% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर हर्ष श्रीकांत खाडे ८२.५० टक्के टक्के गुण व अक्षता सहदेव चाळके 81 टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत.
कोकिसरे येथील माधवराव पवार कनिष्ठ महाविद्यालया मध्ये केवळ वाणिज्य शाखा कार्यरत आहे. येथे सानिका रामकृष्ण राऊत 67.67% गुण मिळवून प्रथम आली आहे. तर दिव्या राजेंद्र सावंत हिने 65.67% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून मीर पंढरी रावराणे व रितेश नारायण गुरव यांनी 60 टक्के गुण मिळवून संयुक्त तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे येथे कला व वाणिज्य शाखा कार्यरत आहे. येथून 33 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. या विद्यालयाच्या कला शाखेतून सोनल संजय कुवळेकरहिने 78 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर कृपा मंगेश सावंत हिने 76.17% व सानिका संजय गुरव हिने 67% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
या विद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून अपर्णा प्रकाश पांचाळ हिने 69.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर सोनल अनंत कांबळे 66.67% गुण व तन्वी संजय गुरव 67% गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
आचरणे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून 71 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शंभर टक्के निकाल लागला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी नीरजा प्रदीप मांजरेकर हिने ८६.७० टक्के गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयासह तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. या शाखेतून तन्वी जितेंद्र कदम हिने 79.33% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर सानिया सत्यवान दळवी हिने 78 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून 31 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेतून सानिका संतोष कदम हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर सानिया महंमद हनीफ रमदुल हिने 77.17% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. व आकांक्षा संतोष गुरव हिने 77 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.