You are currently viewing लागली ही आस

लागली ही आस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*लागली ही आस*

 

संसाराच्या संध्याकाळी मनी ओढाळले

तुझ्या दर्शनासाठी डोळे आता व्याकुळले

 

आनंदे मी जीवन जगले वेचले सुखी क्षण

दु:ख झेलता काट्यांचे *झाकले सारे व्रण*

 

झाले गेले स्मरणी नाही कर्मातच रमले

आता भक्तीत तुझ्या माझे मन कसे विसावले

 

तव भेटीची ओढ लागली मुक्तीतल्या मना

शेवट व्हावा गोड चांगला ही आस मोहना

 

आता कशास मागे पाहू सरे मोह सारे

नामाचे गीत गाते समर्पण करी तुला रे

 

तुटले बंधन सुटल्या गाठी लोभही संपले

ध्यास एकला तव चरणांना स्वप्नात पाहिले

 

*मान विनंती माझी आता* वाट किती पाहू

दूर करी द्वैत हे ..दुरावा कशास मी साहू

 

राधिका भांडारकर पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा