You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम

*न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची उज्वल यशाची परंपरा कायम.*

*एच.एस.सी. चा निकाल ९८.२१ टक्के, २८० पैकी २७५ विद्यार्थी उत्तीर्ण*

*अजित लोक आवाज तर्फ ‌ विद्यार्थ्यांचा होणार सत्कार*

*फोंडाघाट*

फेब्रु./मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या परीक्षेत प्रशालेच्या प्रविष्ठ झालेल्या २८० विद्यार्थ्यांपैकी २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेचा निकाल ९८.२१ टक्के लागला असून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे आहे.

आर्टस शाखा ९५.१२%
प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे, टक्केवारी

१.कु.कदम किरण किशोर
४५६/६०० ७६.००%

२. कु. चेतार साक्षी प्रकाश
४५२/६०० ७५.३३%

३. कु. जाधव अस्मिता सुनिल
४५१/६००. ७५.१७%

कॉमर्स 100% निकाल

१. चव्हाण नितेश गजानन
५१९/६०. ८६.५०टक्के

२. कु. लाड अक्षता अजित
५००/६०० ८३.३३ टक्के

३. कु. गोसावी तन्वी अविनाश
४८८/६०० ८१.३३ टक्के

३. कु. लाड सानिका सुनिल
४८८/६०० ८१.३३ टक्के

एच. एस. सी. व्होकेशनल 100% निकाल

१.कु.बाणे अपुर्वा विनायक
५१६/६००. ८६.००टक्के

२. कु. गुरव सुहानी राजेंद्र
५०५/६०० ८४.१७टक्के

३. कु. घाडी पुष्पा मंगेश

४८९/६०० ८१.५०

३. कु. घाडी तन्वी राजेंद्र
४८९/६०० ८१.५०

सायन्स ९८.०० निकाल

कु. मुणगेकर दुर्गा नंदकुमार
४९५/६०० ८२.५०

कु.राणे ऐश्वर्या मनोहर
४९३/६००. ८२.१७

कु. सरंगले दिव्या नंदकुमार
४८८/६००. ८१.३३

एकूण ૨૮૦ विद्यार्थी बसले होते. २७५ विद्यार्थी पास झाले. एकूण ९८.२१ टक्के निकाल लागला.

यशस्वी विद्यार्थ्याचे फोंडाघाट एज्यू. सोसायटीचे चेअरमन मा. श्री. सु. मा. सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं. शा. लिंग्रस, खजिनदार मा. श्री. आ.मा. मर्ये व शाळा समिती चेअरमन मा. श्री. द. दि. पवार, तसेच मा. संचालक मंडळ, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. विजय रासम, पर्यवेक्षक मा.श्री. प्रसाद पारकर व सर्व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल पंचक्रोशीतील सर्व स्तरातून विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोंडाघाट मध्ये ९८ % रिझल्ट लागला आहे. अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक ‌ तसेच अभिनंदन केले आहे. आर्टस काॅमर्स प्लस टु सर्व ३ नंबरचा अजित लोक आवाज तर्फ ‌ सत्कार करणार आहे. कोकणातील मुलांनी महाराष्ट्रात १ नंबर काढला खरच हे ‌ कौतुकास्पद ‌ असल्याचे सांगितले

 

प्रतिक्रिया व्यक्त करा