देवगड येथे २१ रोजी आंबा बागायतदारांसाठी चर्चासत्र…
रोटरी क्लब देवगड व कोकण कृषी विद्यापीठाचे आयोजन..
देवगड
रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ,दापोली यांच्या संयुक्त विदयमाने २१ मे २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत इंद्रप्रस्थ हॉल डॉटेल डायमंडच्या मागे,देवगड येथे आंबा बागायतदार चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून संजयजी भावे, डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाचे कुलगुरु तर प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश शिनगारे संशोधन संचालक, प्रमुख अतिथी डॉ.सुरेंद्र पतंगे सहयोगी अधिष्ठाता,व डॉ. केतन चौधरी विस्तार शिक्षण विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये आंबा लागवड तंत्रज्ञान आणि आंबा पुनुरुज्जीवन डॉ. के.व्ही.मालशे (कृषी विद्यावेता), आंबा किड व्यवस्थापन डॉ. ए.वाय मुंज ( उद्यान विद्यावेता), आंबा काढणी आणि काढणी पश्चात व्यवस्थापन ( डॉ. एस.बी.स्वामी विभाग प्रमुख) असे विषय असणार आहेत.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त आंबा बागायतदार यांनी या चर्चासत्रामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी- देवगड आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ,दापोली यांच्यावतीने करण्यात आले आहे.