You are currently viewing ‘अक्षरभारती’ आयोजित आंतरराष्ट्रीय मराठी हझल लेखन स्पर्धा निवेदन

‘अक्षरभारती’ आयोजित आंतरराष्ट्रीय मराठी हझल लेखन स्पर्धा निवेदन

पुणे :

‘हझल’ म्हणजे विनोदी गझल. गझलेचा हा उपप्रकार मराठीत संख्यात्मक आणि गुणात्मक ह्या दोन्ही दृष्टीने अधिक प्रमाणात हाताळला जावा, ह्यासाठी पुण्यातील ‘अक्षरभारती’ ह्या साहित्य संस्थेने आंतरराष्ट्रीय मराठी हझल लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. मुदतीत प्राप्त झालेल्या हझलांचे (विनोदी गझलांचे) एखाद्या ज्येष्ठ हझलकाराकडून/गझलकाराकडून परीक्षण केले जाईल आणि त्याद्वारे गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे एकूण चार क्रमांक काढले जातील. स्पर्धेतील विजेत्या चार स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ३,०००/-, २,०००/- , १,०००/- आणि ५०० ह्या रकमेची रोख पारितोषिके आणि सन्मानपत्रे शनिवार दि. ८ जून, २०२४, रोजी दुपारी ५ वाजता पुण्यात भारतीय विचार साधना सभागृहात समारंभपूर्वक प्रदान केली जातील. ह्या पारितोषिक वितरण समारंभातच निमंत्रित गझल/हझलकारांच्या अध्यक्षतेखाली हझल मुशायऱ्याचे आयोजन करण्यात येईल आणि त्यात विजेते चार स्पर्धक हेच निमंत्रित हझलकार असतील.

स्पर्धेचे अन्य नियम, अटी आणि तपशील पुढीलप्रमाणे :

१. ही मराठी हझल लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असून तीत जगाच्या कानाकोपऱ्यातील कुणीही हझलकार/गझलकार रुपये १००/- स्पर्धाशुल्क भरून सहभागी होऊ शकतो.

२. हझलकाराने आपली नवीन आणि अप्रकाशित अशी एकच हझल स्पर्धेसाठी पाठवायची आहे.

३. स्पर्धेसाठी पाठवलेली हझल ही पाचपेक्षा अधिक द्विपदींची असू नये.

४. हझलेत आक्षेपार्ह, वादग्रस्त शब्द असू नयेत.

५. हझल ही कोणत्या वृत्तात आहे, ते स्पष्टपणे नमूद केलेले असावे. हझलेखाली हझलकाराने आपले नाव, पत्ता आणि व्हॉट्सअप क्रमांक नमूद करावे.

६. स्पर्धेसाठी हझला व स्पर्धाशुल्क पाठवण्याची अंतिम मुदत रवी. दि. १९ मे २०२४ ही आहे. स्पर्धेच्या समन्वयक रूपाली अवचरे ह्यांच्या ९८५०८८४१७५ ह्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हझला व G-pay वर स्पर्धाशुल्क दिलेल्या मुदतीत पाठवायचे आहे.

७. विजेत्या चार स्पर्धकांना पारितोषिक वितरण समारंभासाठी आणि गझल मुशायऱ्यासाठी स्वतःच्या खर्चाने यायचे आहे.

८. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

९. वरील नियम, अटी, तपशील ह्यात गरज पडल्यास बदल करण्याचे अधिकार ‘अक्षरभारती’ ही साहित्य संस्था आपल्याकडे राखून ठेवत आहे.

अध्यक्ष, अक्षरभारती, पुणे

सौ.रूपाली अवचरे,

स्पर्धा समन्वयक,

प्रतिक्रिया व्यक्त करा