You are currently viewing सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिर संपन्न

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिर संपन्न

सावंतवाडी :

 

सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी या प्रतिष्ठानच्यावतीने निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना औषधेही देण्यात आली. यावेळी सर्वांची रक्तातील साखरेचीही तपासणी करण्यात आली. या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, डॉ प्रविणकुमार ठाकरे, डॉ चेतन परब यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी कारागृहात निःशुल्क निदान व चिकित्सा सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. तर तुरुंगाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृह आरोग्य शिबिर आयोजित केल्याबद्दल सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले.

या शिबिराचे नियोजन सिंधुमित्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भार्गवराम शिरोडकर, अँड्र्यु फर्नांडिस, भगवान रेडकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर, दीपक गावकर यांनी केले. यासाठी कारागृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने यापूर्वी सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे अनेक उपक्रम बंदिवान बंधू – भगिनींसाठी राबविले आहेत. मनोरंजनासाठी टीव्ही देण्यासह सुमारे अडीज वर्षे प्रत्येक मंगळवारी प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच व्याख्याने आयोजनासह महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून खाऊ वाटप, आवश्यक साहित्य वाटप, योग दिन, आरोग्य शिबीर आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले. तसेच सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात सुमारे ४ महिने प्रत्येक रविवारी बंदिवान बंधुकरिता प्रार्थना, योगा, खेळ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा