*माणगाव खोऱ्यात ‘अवकाळी ‘चे धुमशान*
ढगांच्या गडगडाटासह वीजेचा लखलखाट आणि जोरदार पाऊस
अनेक ठिकाणी उपकरणं जळाली ;गारव्यामुळे मात्र काही प्रमाणात दिलासा
कुडाळ
माणगाव खोऱ्यात आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ आणि उष्णतेत वाढ झाल्याने पाऊस येणार असे भासत असतानाच दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे ढगांच्या गडगडाटासह विजेच्या लकलकाट आणि जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने थोडसं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अचानक आलेल्या पावसाचा फटका हा शेवटच्या टप्प्यात असलेल्या आंबा, काजू, फणस, कोकम या पिकांवर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे मात्र काहीसा उष्माघाताचा दिलासा मिळाल्याचे दिसत असेले तरी हंगामी विक्रेते विक्रेत्यांना या पावसाचा त्रास सहन करावा लागला. गडगडात आणि लकलकाटामुळे अनेक उपकरणांची नासधुस झालेली दिसून येत आहे तसेच विविध मशनरी वर होणारे कामे सुद्धा खोळंबलेली दिसत आहेत. मसाला कांडपाचा हंगाम सुरू असतानाच या मसाला कांडपावरही या पावसाचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे
https://www.facebook.com/share/p/8rLXZr1QiSqfaPUG/?mibextid=oFDknk