You are currently viewing सावंतवाडी येथे 10 ते 14 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन  

सावंतवाडी येथे 10 ते 14 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन  

सावंतवाडी येथे 10 ते 14 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन  

सिंधुदुर्गनगरी

  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामने राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन 2023-24  चे आयोजन दि. 10 ते 14 फेब्रुवारी 2024  या कालावधीत जिमखाना मैदान, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी दिली.

दरवर्षी राज्यस्तरीय प्रदर्शनाची जबाबदारी महाराष्ट्रातील एका जिल्ह्याकडे दिली जाते. यावर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतलेली आहे. या प्रदर्शनाची पार्श्वभूमी आणि स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली देशातील इयत्ता 6 वी 12 वी (प्राथमिक-माध्यमिक) च्या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पकता आणि विज्ञान आणि गणितातील नवनिर्मितीच्या वृत्तीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम, राबवत असते. राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन हा या उपक्रमांचा एक भाग आहे. ज्यामध्ये देशभरातील सर्व राज्यांमधून राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात निवड झालेल्या विद्यार्थ्यांमधील निवडक विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. राज्यस्तरीय प्रदर्शनाची सुरुवात ही तालुकास्तरापासून होते. तालुकास्तरावरील विजयी विद्यार्थी जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात आणि जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात विजयी झालेले विद्यार्थी राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात सहभागी होत असतात. सन 2022-23 चे 50 वी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजीत करण्याचा मान महाराष्ट्र राज्यास मिळालेला होता. हे या प्रदर्शनाचे 50 वे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. हे राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शन दिनांक 26 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, (बॅडमिंटन हॉल) येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

मुलांना त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासा आणि सर्जनशीलतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे.

 मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या घडामोडींमध्ये विज्ञान आणि गणिताची अनुभूती मिळावी आणि त्यांचा उपयोग केवळ देशाच्या आर्थिक विकासातच नव्हे तर समाजात प्रचलित असलेल्या समस्या सोडवण्यासाठीही करता येईल याची जाणीव करून देणे. स्वावलंबन, सामाजिक-आर्थिक आणि सामाजिक पर्यावरणीय विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञानाच्या विकासाकडे मुख्य साधन म्हणून पाहण्यावर भर देणे. मुलांना राष्ट्राच्या भवितव्याबद्दल दूरदर्शी बनवणे आणि त्यांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रोत्साहित करणे.

 विविध लोक, संस्कृती, समाज आणि वातावरणामुळे विज्ञान कसे विकसित झाले आहे आणि प्रभावित झाले आहे हे मुलांना समजण्यास मदत करणे. आजच्या वातावरणात निरोगी आणि शाश्वत समाज राखण्यासाठी जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गंभीर विचार विकसित करणे. कृषी, खते, अन्न प्रक्रिया, जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, वाहतूक, क्रीडा आणि हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान आणि गणिताचा उपयोग नवीन उपाय शोधण्यासाठी केला जाऊ शकतो हा विचार विद्यार्थ्यामध्ये रुजविणे. पर्यावरणीय समस्या आणि आव्हाने याबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना तयार करण्यासाठी मुलांना प्रेरित करणे.

  या प्रदर्शनाचा मुख्य विषय समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology for Society) हा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण पाच उपविषय निर्धारित करण्यात आलेले आहेत.

  • आरोग्य,• जीवन, • शेती/कृषी, • दळणवळण आणि वाहतूक, • संगणकीय विचार.

महाराष्ट्र राज्यातील विज्ञान व गणित शिक्षकांना अध्यापनासाठी शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सन 2006-07 पासून राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येते. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर यांच्यासाठी सुद्धा (गणित व विज्ञान) वैज्ञानिक उपकरण / प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

या प्रदर्शनात राज्यातील 35 जिल्हे आणि मुंबईतील 2 उपविभाग अशा एकूण 37 जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांची गटनिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

प्राथमिक विद्यार्थी गट- 111, प्राथमिक विद्यार्थी गट (आदिवासी क्षेत्र)-16, प्राथमिक विद्यार्थी गट  (दिव्यांग)-18, माध्यमिक विद्यार्थी गट-111, माध्यमिक विद्यार्थी गट (आदिवासी क्षेत्र)-16, माध्यमिक विद्यार्थी गट (दिव्यांग)-18 प्राथमिक शिक्षक (शैक्षणिक साहित्य)-37 माध्यमिक शिक्षक (शैक्षणिक साहित्य गट)-37 प्रयोगशाळा सहाय्यक परिचर- 35  विद्यार्थी, शिक्षक सहभागी सहभागी होणार आहेत.

असे एकूण 290 बालवैज्ञानिक आपल्या वैज्ञानिक प्रतिकृतींचे नवनिर्मितीचे प्रदर्शन या प्रदर्शनातून घडवणार आहेत. तसेच 109 शिक्षक आणि प्रयोगशाळा  सहाय्यक हे आपले विविध शैक्षणीक साहित्य या प्रदर्शनात प्रदर्शित करणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा, त्यांनाही नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी यासाठी सर्व तालुक्यातून दररोज 1 हजार विद्यार्थी व शिक्षक या प्रदर्शनास भेट देतील. अशाप्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

सन 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या कालावधीत या विषयावर आधारित एक दिवसीय विज्ञान मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांसोबतच महाराष्ट्र राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था, विज्ञान संस्था उपक्रमशील शिक्षक हे स्टॉल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृती, परंपरा, आदिवासी कलाकुसरी, विज्ञान व गणिताच्या अध्यापनातील नाविन्यपूर्ण कल्पना, नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयातील पायाभूत संकल्पनांचे स्पष्टीकरण यांचे प्रदर्शन घडविणार आहेत.

या प्रदर्शनीच्या काळात सकाळी 9 ते 10 या काळात विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबत संवाद साधण्याची संधी Science Talk च्या माध्यमातून मिळणार आहे. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे, येथील स्थानिक कलांचा आलेल्या विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या उद्देशाने प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी प्रदर्शन कालावधीत खुले राहणार आहे. तरी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक विज्ञानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शानास भेट द्यावी.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा