You are currently viewing गारपीट

गारपीट

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

*गारपीट*

रानातलं पीक बघून
शेतकरी सुखावला
स्वप्नात हरवला
शेतमाल विकून
घर नवं बांधू
पोराला शहरात
शिकायला धाडू

बायकोला पाटल्या
डोरलं करु
पोरीला इंग्रजी शाळेत टाकू

असं काही काही
मनात त्याच्या येई
आणि सुंदर स्वप्नात
तो हरवून जाई
पण घडलं विपरित
अवकाळी पाऊस आला
गावशिवाराला झोडपून गेला

सैतानी धारा
गारांचा मारा

शिवारातल सगळं पीकं
भुईसपाट झालं
त्याचंही पीक
मातीत गेलं

आत्महत्येचा विचार
मनात आला
पण तो झटकून
तो पुन्हा शेतात गेला
कामाला भिडला

*अनुपमा जाधव*
*भ्रमणध्वनी ८७९३२११०१७*

प्रतिक्रिया व्यक्त करा