हरकुळ बु. गावातील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी..
कणकवली
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बु. गावातील शेख व खडकवाडीला तडाखा बसला होता. पावसामुळे भागातील अनेकांच्या घरांचे छप्पर उडून गेले तर विद्युत तारा व पोल कोसळून नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. किशोर तावडे यांनी नुकसानग्रस्तांची चर्चा केली. विदुयुत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेख व खडकवाडीला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून सुरु होते. महावितरणकडून विदुयुत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.