You are currently viewing भररस्त्यात हल्ला करुन हत्या; लोकांनी व्हिडीओ शूट केला पण मदतीला नाही आले…

भररस्त्यात हल्ला करुन हत्या; लोकांनी व्हिडीओ शूट केला पण मदतीला नाही आले…

भररस्त्यात तरुणाची दोन व्यक्तींकडून हत्या करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या होत असताना रस्त्यावर अनेक लोक होते. याशिवाय कार, दुचाकी आणि इतर वाहनांचीही मोठी गर्दी होती. हत्येचा व्हिडीओही कोणीतरी शूट केला. मात्र घटना रोखण्यासाठी किंवा पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याकरिता मदतीला कोणीच पुढे आलं नाही. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. हत्येचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पीडित व्यक्तीची ओळख पटली असून अजय असं त्याचं नाव आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अजयचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. गाजियाबादमधील लोनी परिसरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाजवणारी या घटनेत रस्त्यावर उपस्थित लोक हत्या होताना पाहत होते, पण मदतीला आले नाहीत.

अजयचा भाऊ संजय याने काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी यावेळी त्यांना तडजोड करण्यास सांगितलं होतं. फुलांच्या दुकानावरुन संजय आणि मुख्य आरोपी गोविंद यांच्यात वाद होता. व्हिडीओमध्ये गोविंदचा मित्र अमितदेखील अजयवर हल्ला करताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये रस्त्यावर रक्त सांडलेलं दिसत आहे. अजयवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − two =