You are currently viewing कुणकेरीच्या कुलस्वामिनी भवानी चरणी श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा भक्ती जागर

कुणकेरीच्या कुलस्वामिनी भवानी चरणी श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा भक्ती जागर

कुणकेरीच्या कुलस्वामिनी भवानी चरणी श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा भक्ती जागर

सावंतवाडी:

कुणकेरी भवानीवाडी येथील सावंत भोसले कुलस्वामिनी श्री देवी भवानी चरणी श्री जगन्नाथ संगीत विद्यालय आंदुर्लेचा भजनारंग आणि ढोलकी भुलली मृदुंग सवे घेऊनी तबल्याला हा संगीतमय कार्यक्रम मंगळवार १४ मे २०१४ रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आंदुर्ले येथील श्री जगन्नाय संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत आणि त्यांच्या ग्रुपने हा संगीतमय कार्यक्रम सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.

पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या अप्रतिम पखवाज वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांना साथ देणारे पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, पखवाज विशारद सचिन कातवणकर, गायक तसेच हार्मोनियम वादक अमित उमळकर, संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर, तबलावादक विनायक जोशी, गायिका विद्या कवठणकर, युवा गायिका . कु. कशिष खडपकर, गायक विश्राम गोवेकर यांनीही अप्रतिम सादरीकरण केले.विशेष म्हणजे पखवाज अलंकार महेश सावंत यांच्याकडून पखवाज वादनाचे प्रशिक्षण घेणाऱ्या त्यांच्या३६ विद्यार्थ्यांच्या सुश्राव्य पखवाज वादनाचे अतिशय सुंदर असे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली.यावेळी सावंत-भोसले कुलस्वामिनी भवानीवाडी परिवारातर्फे पखवाज अलंकार महेश सावंत यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

तसेच त्यांचे सहकारी गायक व वादकांनाही शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या पखवाज वादनात सहभागी झालेल्या सर्व वादकांना श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महेश सावंत यांनी आपली कुलदेवता श्री देवी भवानी आईच्या चरणी माझी संगीत सेवा सादर करता आली याचा आनंद व समाधान प्राप्त झाल्याचे सांगुन इथे मिळालेल्या यथोचित मानसन्मानाने संपूर्ण टिम आनंदाने गहिवरून गेल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे निवेदन सौ. निता नितीन सावंत- भोसले यांनी केले.

*संवाद मीडिया*

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Once in a lifetime offer*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी करीता
✅ *आरटीओ टॅक्स फ्री* ✅

♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..

♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध

✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ आणि ५ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*

*सर्व ॲाफर करीता नियम व अटी लागु.*
जाणून घेणेसाठी आजच संपर्क करा

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/133162/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा