You are currently viewing अबोलाही कधी कधी….!!

अबोलाही कधी कधी….!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अबोलाही कधी कधी……!!*

 

स्मित कधीच

छळत नाही

हसलचं पाहिजे

असही नाही…

 

अबोलाही कधीकधी

बोलका असतो

मौनातही खूप

सांगून जातो…

 

बिंबाचं प्रतिबिंब

डावउजवं होतं

पारा चढला

रूप पालटत..

 

भोगाची वस्त्रे

मळकी होतात

त्यागाची वस्त्रे

तेजाने उजाळतांत..

 

बिंब प्रतिबिंब

जाणिवेत असत

मनाच्या तळाशीचं

दर्शन देत…

 

अबोलाही कधीकधी

मुकेपणाला पांघरतो

उसवत नाही

सांधत जातो…..!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा