You are currently viewing इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरात २३ रोजी आत्म साक्षात्कार दिन सोहळा होणार साजरा 

इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरात २३ रोजी आत्म साक्षात्कार दिन सोहळा होणार साजरा 

इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरात २३ रोजी आत्म साक्षात्कार दिन सोहळा होणार साजरा

बांदा

इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ आंबीये मंदिरात गुरुवार दिनांक २३ रोजी आत्म साक्षात्कार दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६ वाजता काकड आरती, ८.३० वाजता श्रीं च्या पादुकांवर अभिषेक, ९.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री संत सोहिरोबानाथ भजन मंडळ बांदा यांचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पर्यंत पालखी सोहळा, रात्री ९.३० वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा ब्रम्ह पदार्थ अर्थात महिमा जगन्नाथ पुरीचा हा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष विश्राम पालव, सचिव गुरुनाथ पेडणेकर यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा