You are currently viewing न्हावेली रेवटेवाडी येथे जीर्ण झालेला लोखंडी विद्युत पोल कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही

न्हावेली रेवटेवाडी येथे जीर्ण झालेला लोखंडी विद्युत पोल कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही

न्हावेली रेवटेवाडी येथे जीर्ण झालेला लोखंडी विद्युत पोल कोसळला सुदैवाने जीवितहानी नाही

न्हावेली

न्हावेली रेवटेवाडी येथील जीर्ण अवस्थेत असलेला लोखंडी विद्युत पोल शेजारील घरावर कोसळून विदुयत तारा तुटून पडल्या. याची माहिती येथील ग्रामस्थांनी तात्काळ विदुयत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून कोणत्याही प्रकार नुकसान झालेलं नाही . हा जीर्ण झालेला धोकादायक पोल तात्काळ बदलावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी मागील एक वर्षापासून विद्युत वितरण कंपनीला करत होते .

 

परंतु विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या मागणीवर दुर्लक्ष करत कोणतीही ठोस उपयोजना केली नाही व आज सकाळी हा विद्युत पोल कोसळून एका घरावर पडला. सुदैवाने त्यावेळेस कोणीही पाळीव जनावर व लहान मुले नसल्याने जीवित हानी टळली पण ही झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे .आपण वारंवार तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील ग्रामस्थ नाराज आहेत ज्यावेळी पोल कोसळला त्यावेळी आसपास कोणीही पाळीव प्राणी किंवा माणूस किंवा छोटी मुलं असली असती आणि त्यांना इजा झाली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता असाही प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत .

 

वारंवार तक्रार देऊनही गजलेले धोकादायक पोल बदलावा अशी मागणी करूनही यावर का दुर्लक्ष करण्यात आला याचे उत्तर आता विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने देणे गरजेचे आहे विद्युत वितरण कंपनीचा हा आंधळा कारभार असाच चालत राहिल्यास व न्हावेली गावातील गजलेले सर्व विद्युत पोल तात्काळ न बदल्यास सावंतवाडीतील विद्युत कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थान दिला आहे.
यावेळी घटनास्थळी स्वप्नील जाधव , अर्जुन जाधव, उदय जाधव ,रामचंद्र मयेकर , विश्वानभर नाईक, प्रकाश जाधव , राहुल जाधव, रोहित जाधव, श्रीयंश जाधव , अक्षय जाधव , अमित जाधव , सागर जाधव , आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा