You are currently viewing वारस होऊ सैनिकी परंपरेचे…

वारस होऊ सैनिकी परंपरेचे…

वारस होऊ सैनिकी परंपरेचे…

काळानुरूप जलदगतीने बदलत जाणाऱ्या शैक्षणिक गरजा, विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, वाढत्या स्पर्धात्मक जीवनात जिद्दीने आणि महत्वाकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी निर्माण करण्याचे पवित्र आणि प्रामाणिक ध्येयरूपी कार्य सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन संचलित शासनमान्य सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली गेली २० वर्षे अविरतपणे करित आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली, डोंगर कडयांनी सजलेली आंबोली ही किमयागार निसर्गाची हिरवीगार निर्मिती. बारा महिने हिरव्या रंगाने साजलेल्या आंबोलीचं भिजलेले मोहक रूप आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहून मन शहारून जातं. अशा हव्याहव्याशा वाटणाऱ्या वातानुकुलित वातावरणात ही ज्ञानाची गंगा ज्ञानदानाचे कार्य अखंडित करित आहे.

सैनिक हे नाव ठेवून निर्माण केलेल्या प्रशालेत सैन्यातील उच्च पदस्थ अधिकारी घडविणे हे आमचे ध्येय आहेच. परंतु आजच्या काल निहाय शिक्षण प्रणालीतून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक बदल करून विद्यार्थ्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध बौध्दिक, शैक्षणिक आणि शारिरीक प्रशिक्षण असा आंबोली सैनिक स्कूल पॅटर्न आम्ही यशस्वी केला आहे.

सैनिक स्कूल आंबोली ही शासनमान्य अनुदानित इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ज्ञान, आचार, आणि विचारांनी समृध्द आणि सशक्त आदर्श भावी नागरिक बनविणारी शाळा असा आपला अल्पावधीत नावलौकीक मिळविला आहे.
आजमितीस इयत्ता सहावी ते बारावी सायन्स पर्यंतचे वर्ग सुरू असून देशाच्या विविध शहरांतून आणि ग्रामीण भागांतून आलेले विद्यार्थी तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणा बरोबरीनेच व्यावहारिक दुनियेची अनुभूती घेत हे बालसैनिक बौध्दिक, शैक्षणिक, शारिरीक, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परिक्षांचा निकाल सातत्याने १०० टक्के लागत आलेला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य गुणवत्ता श्रेणी संपादन केली आहे. विविध क्रिडा प्रकारात या शाळेच्या गुणवान खेळाडूंनी राज्यस्तराबरोबरच देशपातळीवरही आपल्या कौशल्याची चमक दाखविली आहे. या वर्षी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरती मजल मारित यश संपादन केले आहे. गुणवत्ता व दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात शाळेने पुरस्कार प्राप्त केला आहे.

तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध वेळापत्रकाच्या सहाय्याने शैक्षणिक आणि
शारिरीक सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी शैक्षणिक पाठयक्रम अभ्यासाबरोबरीनेच, वक्तृत्व, काव्यवाचन, संगीत, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन आणि तयारी, प्रश्नमंजुषा, वादविवाद, योगा, ज्युदो,कराटे, मल्लखांब, अडथळा शर्यत, लष्करी कवायत इत्यादी कौशल्ये विकसित केल जातात.

आंबोली हे डोंगर दऱ्यांत वसलेले असल्यामुळे त्याचा फायदा ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी नैसर्गिकपणे होत आहे. आंबोलीच्या मुक्त स्वच्छ हवामानात आमचे विद्यार्थी विविध कौशल्ये आत्मसात करत आहेत.

शहरातील वाढत्या प्रदुषणामुळे शहरी जीवन म्हणजे रोगांना आमंत्रण असे समीकरण आजकाल दृढ होत आहे. अशा बदलत्या जीवनकौशल्यात निसर्गरम्य व शुद्ध स्वच्छ हवा असलेल्या आंबोली येथे आणि ज्ञानदानाचा वसा घेऊन निर्माण झालेली सैनिक स्कूल आंबोली हा निवासी स्कूलसाठी एकमेव उत्तम पर्याय होय.

विविध स्पर्धापरिक्षांचे अचूक मार्गदर्शन :-

सध्याचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. सैनिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक युगामध्ये
सक्षम बनविण्यासाठी विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा परिक्षांना बसण्याची संधी प्रशालेमार्फत
देण्यात येते. एन.डी.ए. प्रवेशपरीक्षा ही सैन्याधिकारी होण्यासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धापरीक्षा स्कूलमधील १२ वी सायन्समध्ये अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी सप्टेंबर आणि एच. एस. सी. बोर्ड परीक्षेनंतर एप्रिलमध्ये होणाऱ्या एन.डी.ए. परीक्षेस बसविले जाते.

तसेच इंजिनिअरिंग व मेडिकलशी संबंधित नॅशनल लेव्हलवर घेतल्या जाणाऱ्या IIT JEE, AIPMT, AFMC अशा स्पर्धापरीक्षांचे बहुमूल्य मार्गदर्शन केले जाते व या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविले जाते. महाराष्ट्र राज्यस्तरावर घेतल्या जाणाऱ्या MHT-CET या परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट होतात. या नॅशनल व स्टेट लेव्हलवरील स्पर्धापरीक्षांच्या तयारीमुळे भविष्यकालीन स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पायाभरणी होते.

स्पर्धा परीक्षांतील उज्ज्वल यश :-

सिंधुदुर्ग जिल्हा व परिसरातून सैन्याधिकारी निर्माण करणे, एन.डी.ए. आणि समकक्ष राष्ट्रीय
राज्य स्पर्धा परिक्षांसाठी युवकांना सक्षम बनविणे हे सैनिक स्कूलचे ध्येय. शाळेच्या पहिल्या बॅचचे
गुणवंत विद्यार्थी कॅडेट अनय सावंत, कॅ. प्रथमेश सावंत, कॅ. आदित्य वर्दम यांनी पहिल्याच प्रयत्नांत
एन.डी.ए. च्या लेखी प्रवेश परीक्षेत यश संपादन केले. कॅप्टन रोहित शिंदे, कॅप्टन रुद्र खोचरे हे सैन्यसेवेत रूजू आहेत तर लेफ्टनंट आकाश लाड हा प्रशिक्षण घेऊन लवकरच सेवेत दाखल होणार आहे. या सैनिक स्कूलच्या कॅडेट्सचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्ता यादीत कोकणाने आपला अव्वल दर्जा कायम राखला आहे. याच गुणवत्तेला पैलू पाडून सैन्यसेवेत अधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन व खडतर सैन्य प्रशिक्षण देण्याचं कार्य सैनिक स्कूल करत आहे. शै. वर्ष २०१३-१४ मध्ये कॅ. प्रतिक गावडे, शै. वर्ष २०१४-१५ मध्ये कॅ. मधुसुदन लाड, कॅ. साहिल वालीकर, कॅ. अनिकेत सावंत या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. लेखी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. भविष्यकाळात निश्चितच भारतीय सैन्यदलामध्ये उच्चपदस्थ अधिकारीपदावर सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी असतील, असा सर्वाना आशावाद आहे.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता इ. ६ वी व इ. ११ वी ( सायन्य) रिक्त जागांसाठी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून इच्छुक पालकांनी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली फोन
नं. ०९४२०१९५५१८, ०७८२२९४२०८१ येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थाध्यक्ष व शाळेच्या प्राचार्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा