You are currently viewing मालवणात उद्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा

मालवणात उद्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा

मालवणात उद्या जिल्हास्तरीय सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा

जीवनगौरव पुरस्काराचे होणार वितरण

मालवण

अष्टपैलू कलानिकेतन, मालवण या संस्थेतर्फे स्व. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ६ वा. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात होणार आहे.

यावर्षी अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुजाता शेलटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. दत्तप्रसाद खानोलकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.


सवेश साभिनय नाट्यगीत स्पर्धा बालगट १२ वर्षांपर्यंत, युवा गट १३ ते २० वर्षांपर्यंत व २० वर्षांवरील खुला गट अशा ३ गटांत घेतली जाणार आहे. बालगटासाठी अनुक्रमे रू. ७००, ५००, ३०० व उत्तेजनार्थ तीन क्रमांक रु. २०० व भेटवस्तू, युवागटासाठी रू.१२००, ८००, ५०० व ट्रॉफी, उत्तेजनार्थ तीन क्रमांक रु. ३००, तसेच खुल्या गटासाठी रू. २०००, १५००, १००० व टॉफी, उत्तेजनार्थ तीन क्रमांक रु. ५०० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.


तर यानिमित्त दि. १५ मे रोजी सायंकाळी ६ वा. दत्त मंदिर, भरड येथे नटसम्राट, संगीत स्वयंवर, वाहतो ही दुर्वांची जुडी, संगीत दाक्षायणी हे नाट्यप्रवेश सादर होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा