सातार्डा-ओटवणेवाडी येथे बिबट्याकडून वासरू फस्त..
सातार्डा
सातार्डा ओटवणेवाडी येथील अमित नागवेकर यांच्या मालकीचे गायीचे वासरू बिबट्याने फस्त केले. बिबट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढला आहे. वनविभागाचे अधिकारी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामस्थ अमित नागबेकर यांनी वासराला नायलॉन दोरीने अंगणात बांधले होते. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने सदर वासरावर हल्ला केला. नायलॉन दोरी न तुटल्याने बिबट्याने वासराला अंगणात फस्त केले. घटनेची पाहणी सातार्डा पशुधन पर्यवेक्षक डॉ. एल. ए. गावडे यांनी केली.
बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.