*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*
*स्मृति भाग ६८*
समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज आपण *गौतम स्मृतिमधील* दुसर्या अध्यायातील काही विशिष्ट गोष्टी पाहू . तशी सगळीच स्मृतिवचने विचार करण्यासारखीच आहेत , पण एखाद्या जनावरासमोर किंवा उदाहरणार्थ माकडासमोर असं म्हणू , जर गीता वा एखादे उपनिषद वा एखादी स्मृति वा एखादा वेद ठेवला आणि त्याचे बाजूला केळ ठेवले तर माकड काय निवडेल ? उत्तर सोपे वाटते ना ?
जे विज्ञानाचे वेडे आहेत वा विज्ञानात अर्धवट बुडालेले आहेत , त्यांना अध्यात्म वा देव समजावून सांगण्याच्या भानगडीत पडायचच नसतं कधी ? उपयोगच नसतो ! विज्ञानाचे वेडाचे मडके कच्चे असतो . खेडेगावात एक गोष्ट घडते . कुणी कुणी पपईची झाडे लावतात . एखादे झाडाची फुले फळावर यायला लागली वा त्याला छोटी पपई लागली की ती गळून पडणार !! असं प्रत्येक फुलाचे वा फळाचे बाबतीत घडून त्या झाडाला पपयाच लागत नाहीत . मग तो शेतकरी वा गावाकडचा माणूस त्या पपईचे झाडाला वापरुन वापरुन झिजलेली व प्रचंड घाणेरडा वास असलेली चामड्यापासून बनलेली चप्पल बांधतो . याचे उत्तर अजून ना वैज्ञानिकांजवळ आहे ना अंधश्रद्धेच्या नावाने नाचणार्यांजवळ आहे . पण फरक पडतो व खूप पपया लगडतात , हा अनुभव प्रत्येक शेतकर्याचा वा पपई लावणाराचा आहे . भारताला स्वातंत्र्य मिळाले , तो काळ विज्ञानाचे वय वाढण्याचाच होता , तेंव्हा कुणीही अध्यात्माला काहीही बोलले तरी गोड वाटायचे व हसू यायचे वैदिकांकडे पाहून !!! आज परिस्थिती वेगळी आहे . विज्ञान हे राक्षस बनून माणसांचे नरडीचा घोट घ्यायला टपलेले आहे व कोरोना अध्यात्म शिकवतोय — नमस्कार करावा , हस्तांदोलन नको . जैन मुनिंसारखे मास्क लावून दिवस घालवावा . हात पाय तोंड दर वेळेस धुवावे . इ. असो . आता आपल्या विषयात पुन्हा प्रवेश करु .
मूळ मुद्दा , अध्यात्माला नावे ठेवणारे वेडेच आहेत वा असतात , हाच आहे .
तर *गौतम ऋषिंनी* दुसर्या अध्यायात प्रथमच स्पष्ट लिहिलेले आहे => *न तदुपस्पर्नादशौचम्* म्हणजे ज्यांचे उपनयन झालेले नाही , ते मनोनुकुल कार्य , भाषण वा भक्षण करणारे असतात . त्यांचेसाठी कुठलेही नियम नसतात *त्यांचे उपस्पर्शाने अशौच ही होत नाही* असा त्या ओळीचा खरा अर्थ .
चक्रावले ना सगळे ?? कारण ” शिवला ” म्हणून कळण्याची अक्कल नसतांनाही मुलांनी मार खाल्लेला आहे आणि त्यात आम्हीही होतोच म्हणा !!!😂😂😂 एखाद्या नियमाचे बंधन कसे पाळावे असे कधी शिकवले गेले नाही वा नियमांचा अतिरेक होणे , हे एक कारण असू शकते का संस्कृतिचे उत्थान थांबण्याचे ?? कृपया विद्वानांनी प्रकाश टाकावा .🙏🙏
उपनयनानंतर सन्ध्या हा जीवनाचा अविभाज्य भाग बनतो . पण त्याचे संदर्भात गौतम ऋषि काय म्हणतात , ते पाहू .
*बहिः सन्ध्यार्थञ्चातिष्ठेत् पूर्वामासीतोत्तरां सज्योतिष्या ज्योतिषो दर्शनाद्वाग्यतो नादित्यमीक्षेत् ।*
सन्ध्येसाठी गावाचे बाहेर जावे . पूर्वा सन्ध्या उभे राहून करावी . सायंकालीन सन्ध्या सायंकालीन प्रकाशात तार्यांचे दर्शन होईस्तोवर वाणीवर संयम ठेवून बसून करावी . सूर्यास पाहू नये . ( सायंकालीन सन्ध्यावेळी )
तसे मी या ही आगोदर सांगत आलो , की माझ्या वयाचे ऐन पंचवीशीत माझी एक *दत्तस्वामी* नावाचे यतींशी ओळख झाली . ते मला सांगून गेले की , ” सन्ध्या ही समूह प्रार्थना आहे . *सन्ध्येचा वैदिक अर्थ समूह प्रार्थना हा आहे .* ती एकट्याने करावयाची नाही . ” आणि असे करण्यानेच द्विज ( ब्राह्मण , क्षत्रिय व वैश्य ) एकत्र राहू शकतो अन्यथा नाही कधीच !!! हे ही आजच सांगून ठेवतो . जागे व्हा व देश एकसंघ ठेवा . बाकी उद्या पाहू . आज थांबतो .
सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे )