वेंगुर्ला येथे आयोजित “स्वरसंध्या” संगीत मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…
वेंगुर्ला
येथील तबलापटू कै. रमेश मेस्त्री याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे बंधू महादेव मेस्त्री यांनी आयोजित केलेल्या “स्वरसंध्या” संगीत मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लागला. यावेळी शास्त्रीय संगीत, भक्ती गीत, भावगीत, नाट्यगीत व अभंग सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज को.ऑप. सोसायटी वेंगुर्ला शाखेचे व्यवस्थापक पुरुषोत्तम राऊळ, नित्यानंद आठलेकर, विजय मेस्त्री, महादेव मेस्त्री आदी उपस्थित होते. यावेळी अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही क्षेत्रात ‘विशारद‘ पदवी मिळविलेले वडखोल येथील युवक सचिन पालव याचा अनघा गोगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान या संगीत मैफिलीत माणगांव येथील योगेश बोरचाटे, विजय मेस्त्री, पल्लवी पिळणकर, ओजस्वी पिळणकर, ऋचा पिळणकर, उभादांडा येथील अमृता पेडणेकर यांनी विविध गाणी सादर केली. त्यांना तबल्यासाठी जस्मित पिळणकर, हार्मोनियमसाठी पल्लवी पिळणकर यांनी साथ दिली. तसेच त्याच्यासोबत त्याचे विद्यार्थी पूर्वा जोशी (मठ) हिनेही गाणी सादर केली. यांना वेदांत बोवलेकर (तबला), प्रसन्ना गावडे (पखवाज), सचिन पालव (हार्मोनियम), सुयोग जोशी (टाळ) यांनी साथ दिली.