You are currently viewing आई

आई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य श्री.अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

उद्याच्या मातृदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा! 

 

*”आई”*

आई कसे मी विसरू बहुमूल्य ऋण

कितीही जन्म घेतले तरीही अपूर्ण।।धृ।।

 

वात्सल्याचा उमाळा सृजन हृदयांत

काळीज तुटे व्यथा राहतसे मनांत

पोरकाच मी जगतो आहे तुझ्या वीण।।1।।

 

आई सारखे दैवत नाही जगतांत

वाढवी सांभाळी काळजी घेई सतत

आई देवांना वंदन धरावे चरण।।2।।

 

आई परमेश्वर मुलाचे पाही हित

कधीही संकटात”आई”येत मुखांत

वृक्षासम सर्वां सावली करी अर्पण।।3।।

 

नऊ मास सांभाळून ठेवी उदरांत

लेक मोठा होईल पाही स्वप्न उरात

ममते पोटी जीवन टाकी ओवाळुन।।4।।

 

संस्कार सुगूण दाविलेस प्रपंचात

सर्व काळी तव आशीर्वाद साथ देत

विधात्याचे लाभले निर्मळ कृपादान।।5।।

 

पुत्राचे भल्यासाठी कष्टकरी सतत

निष्काम आदर्श प्रेम देई सदोदित

मुलाची भाषा हृदगत आईच जाण।।6।।

 

खालून वर नेई गुरुत्वाकर्षण

बिजांडातून घेऊन जात ब्रह्मांडात

आईचा देव पणा येईच समजून।।7।।

 

लक्ष पिलापाशी घार आकाशी फिरत

पुत्राचे अपराध माता न करी खेद

आई देवा पुढील रांगोळी निरांजन।।8।।

 

आई सूर्य तेज अंध:कार मिटवीत

गंगेसम पवित्र चिंतितसे उचित

स्वामी तीन जगाचा अनाथ आई वीण।।9।।

 

काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा