You are currently viewing आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे – (लेख माला) दिनकर शंकर भुजबळ

आठवणीतील आगळीवेगळी व्यक्तीमत्वे – (लेख माला) दिनकर शंकर भुजबळ

 

 

माझे खोपोली चे स्नेही श्री. दिनकर शंकर भुजबळ हे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक असून ते मितभाषी, नम्र, संकोची स्वभावाचे आहेत. जवळपास आमची ३० वर्षाहून अधिक काळ मैत्री आहे.

यशवंती हायकर्स चे ते संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या अनेक थरारक रेस्क्यू मोहिमांचे मी वार्तांकन केले. त्यांच्या जाहीरात एजन्सी मार्फत त्यांनी खोपोली परिसरावर लोकसत्ताच्या खोपोली विशेष एकाच वेळी लोकसत्ता ,इंडियन एक्सप्रेस , फायनान्शिअल एक्सप्रेस , जनसत्ता, समकालीन जाहिरात पुरवणी

प्रकाशित केली. सकाळ साठी देखील विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. मी लोकसत्ता, सकाळ त्यात लेख लिहिले होते.

स्व. व्यंकटेश वेल्हाळ यांनी खोपोली येथे साहित्य सहवास संस्था स्थापन केली होती. मी कार्यकारिणी मध्ये होतो. दिनकर त्यावेळी कार्यक्रम असले की येत असे. तो सामाजिक, शैक्षणिक कामाकडे विशेष रस घेऊ लागला.तो पत्रकारितेत उतरला. त्याने स्वतःच्या माध्यमातून विशेषांक प्रसिद्ध केले. काही मध्ये माझे लेखन होते.

त्यांनी आपले ध्येय काय ठेवले विचारले असता ते म्हणाले की, पदवीधर झाल्यानंतर आता काय? नोकरीकरीता वणवण भटकायचे की व्यवसाय करायचा? किर्लोस्कर मासिकांमध्ये स्काय पॅक कुरियर सर्विस संदर्भात एक लेख – शोभा बोंद्रे (बांद्रा ) यांचा वाचण्यात आला आणि त्यानंतर “सुविधा” कुरियर सर्विस या नावाने कुरियर व्यवसाय सुरू करून जवळपास १५ वर्ष या व्यवसायात काम करत असताना, डोंबिवलीचे दादा पांडे “पब्लिसिटी कम्बाईन” जाहिरात एजन्सी चे मालक यांच्या सहवासामुळे जाहिरात व्यवसायात पदार्पण, (न्युज पेपर जाहिरात), बातमीदार ते संपादक, न्यूज पेपर अधिकृत वितरक अशा विविध प्रकारच्या दर्जेदार कामांचा समावेश झाला.

सुरूवातीला सुविधा कूरियर सर्विस त्यांनी सुरू केली. खोपोली इंडस्ट्रियल इस्टेट मुळे त्यांना भरपूर व्यवसाय मिळाला. त्यांनी पदवीधर, सुशिक्षित तरुणांना यात रोजगार मिळवून दिला. हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

त्यांनी नंतर वृत्तपत्र वितरण एजन्सी चालू केली. कोरोनामुळे वितरण व्यवस्था बंद पडली.

सध्या त्यांचा व्यवसाय न्यूज पेपर जाहिरात एजन्सी आहे. अनेक वृत्तपत्रांना त्यांच्या एजन्सी मुळे जाहिराती मिळत असतात. माझ्या शब्दाखातर त्यांनी अनेक वृत्तपत्रांना जाहीराती दिल्या आहेत.

त्यांचा दांडगा अनुभव, मोठा जनसंपर्क, मोठ्या नेत्यांमध्ये उठबस असल्याने ते शहरातील एक प्रतिष्ठीत नागरिक आहेत.

अनेक वर्षापासून त्यांनी सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, कला – क्रीडा सांस्कृतिक अशा विविध प्रकारच्या कामांमध्ये सातत्याने सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध यशवंती हायकर्स चे ते संस्थापक सदस्य असून अनेक साहसी मोहिमा (महाराष्ट्र व हिमालयातील), रेस्क्यू ऑपरेशन गिर्यारोहणाचे प्रशिक्षण यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

तसेच ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विविध उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होतात. जनजागृती मेळावे, शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये देखील त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

संविधान दिन, मतदार जनजागृती, वृक्ष लागवड व जोपासना, पाणी बचत, आरोग्य, स्वच्छ व सुंदर शहर राहण्याकरिता सतत पाठपुरावा ते करत राहतात.

शहरातील उदभवणाऱ्या समस्यांकडे त्यांचे कायम लक्ष असते.

खालापूर तालुका पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य असून विविध प्रकारच्या उपक्रमास प्रसिद्धी मिळावी त्याकरिता पाठपुरावा, अन्यायाला वाचा फोडण्याकरता प्रभावी काम करतात.

परिवर्तन नाट्य संस्थेचा ते संस्थापक सदस्य असून नवोदित कलाकारांना प्रशिक्षण व त्यांच्याकडून एकांकिका, पथनाट्य, अनेक स्पर्धांमध्ये पाठवून त्यांना प्रोत्साहन मिळेल यासाठी ते कृतीशील असतात.

खोपोली बाराखडी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शहराच्या विकासाकरिता व नागरी समस्यांचा पाठपुरावा करण्याकरिता या संस्थेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण लोकोपयोगी काम करीत आहेत.

प्रसिद्धी पराड़ग्मुख असल्याने शांततेत त्यांचे कार्य सुरू असते.

 

 

-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पत्रकार 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा