कुणकेश्वर चरणी हजारो देवगड हापूसची आरास…
सलग दहाव्या वर्षीही हापूस आंब्याच्या आरासची जपली परंपरा..
देवगड
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात ११ मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो. याचं कारणच तसंच आहे.
कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार व देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून श्री देव कुणकेश्वर मंदिरात आंब्याची आरास करण्याचा संकल्प करण्यात आला .आज बघता बघता त्याला दहा वर्षे झाली दरवर्षी ११ मे या कालावधीत देवगड हापूसची आरास न चुकता केली जाते. देवगड तालुक्यातील व कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार न चुकता कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात यातूनच ही आरास केली जाते. यावर्षी ऋतुचक्र सातत्याने होणारे बदल त्यातच आंबा पिकावर आलेले मोठे थ्रिपचे संकट अशातूनही मार्ग काढत आंबा बागायतदारांनी आंबा पिकाचे उत्पादन चांगले घेत आंबा पीक टिकवण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला हापूस आंब्याची आरास कमी प्रमाणात करण्यात येत होती. मात्र जसजशी त्याची महती वाढत गेली .त्यानुसार आंबा बागायतदार यांची हापुस आंबा पेटी देणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली. त्यामुळे मोठ्या पद्धतीने ११ मे या दिवशी देवगड हापूस आंब्याची आरास श्री देव कुणकेश्वर मंदिरात केली जात आहे. श्री देव कुणकेश्वर मंदिर केलेल्या हापूसच्या आरासामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर हापूसच्या सुगंधाने दरवळून गेला आहे .
कुणकेश्वर मंदिरातील गाभारा सभामंडप बाहेरील सभामंडप या ठिकाणी ही आरास करण्यात आली आहे. अनेक भक्तगण कुणकेश्वरलाही ही देवगड हापूस आंब्याची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात त्याचे फोटो सेशन करणे पसंत करतात. कुणकेश्वर मंदिरात केलेल्या या आरास मधील हापूस आंबे प्रसाद मधून आलेल्या भाविकांना दुसऱ्या दिवशी वितरित केला जातो. गेली दहा वर्षे कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार देवगड हापूस च्या पेट्या या आराससाठी देत आहेत आणि त्यातीलच काही भक्तजन मंडळी आपल्या कलेचा नमुना सादर करत अप्रतिम अशी कुणकेश्वर चरणी हापूस आंब्यांची आरास सजावट करत आहेत.
यावर्षीही हजारो आंब्यांची आरास श्री देव कुणकेश्वर चरणी करण्यात आलेली आहे
*संवाद मीडिया*
*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣
*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹
*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️
*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/
*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️
*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡
*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*
*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*
*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*
*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*