You are currently viewing मालवण-वायरीत ११ व १२ मे ला सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन…

मालवण-वायरीत ११ व १२ मे ला सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन…

मालवण-वायरीत ११ व १२ मे ला सी फूड फेस्टिव्हलचे आयोजन…

मालवण

वायरी वराडकरवाडी येथील हॉटेल रापण एक्सपीरियंस तर्फे ११ व १२ मे ला सी फूड फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये मत्स्य खवय्यांना तंदुरी फिशच्या विविध प्रकारांचा आस्वाद लुटता येणार आहे.११ व १२ मे रोजी दोन दिवस हा फेस्टिव्हल चालणार आहे. अनेक नावीन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल यामध्ये आहे. रापण हे नेहमीच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके खाद्यपदार्थ यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी सुद्धा येथे नौदल दिन साजरा झाला. त्यावेळी रापण मधील खास मालवणी पदार्थ आणि जेवण राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी मागविण्यात आले होते. आता तर या फेस्टिव्हलमधे माशांचे नावीन्यपूर्ण तंदुरीचे प्रकार हे खास आकर्षण असणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या खाद्य महोत्सवामधे खास सी फूड तंदुरी डिशेसचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी मत्स्य खवय्यांनी या सी फूड फेस्टिव्हल मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा