You are currently viewing सावडाव धरणाच्य कामाला प्रकल्‍पग्रस्तांचा तीव्र विरोध…

सावडाव धरणाच्य कामाला प्रकल्‍पग्रस्तांचा तीव्र विरोध…

सावडाव धरणाच्य कामाला प्रकल्‍पग्रस्तांचा तीव्र विरोध…

भूसंपादन न करताच काम सुरू; ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

कणकवली

तालुक्‍यातील सावडाव येथे प्रकल्‍पग्रस्त शेतकऱ्यांची परवानगी न घेता तथा भूसंपादन न करताच धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी संबधित ठेकेदार आणि जलसंधारणाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी आज सावडाव प्रकल्‍पग्रस्त ग्रामस्थांनी केली. जर गुन्हे दाखल न झाल्‍यास ग्रामस्थ आपल्‍या पद्धतीने जमिनीचे रक्षण करतील असा इशाराही सावडाव प्रकल्‍पग्रस्तांनी दिला आहे.

सावडाव प्रकल्‍पग्रस्तांनी आज वैभव सावंत यांच्या नेतृत्‍वाखाली कणकवलीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी भेट घेऊन त्‍यांना निवेदन दिले. यात म्‍हटले आहे की, आम्‍हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सावडाव धरण – २ चे उद्‌घाटन झाल्‍यावर एक महिन्याच्या अात प्रत्‍येक प्रकल्‍पग्रस्तास त्‍याच्या भूसंपादीत जमिनीतील झाडे, बांधकाम, विहीर, जमिनीतील इतर बाबींचा तसेच जमिनीचा किती मोबदला कधी व कोणत्‍या प्रकारे मिळणार याबाबतचे लेखी स्वरूपातील पत्र देण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्‍या आश्‍वासनाची पूर्तता न करताच धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामास आम्‍हा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कोणत्‍याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करताच ठेकेदाराला हाताशी धरून जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी श्री.शिरोडकर यांनी आपल्‍या पदाचा गैरवापर केला आहे. तसेच आमच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण व घुसखोरी करून परस्पर धरणाचे काम सुरू केलेले आहे.

त्‍यामुळे श्री.शिरोडकर आणि ठेकेदार यांच्या विरोधात तत्‍काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. कायद्याने आमच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करण्याचे अधिकार आम्‍हाला मिळालेले आहेत. आम्‍हाला आमच्या जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात आपणाकडून गुन्हे दाखल न झाल्‍यास आमच्या जमिनीचे संरक्षण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्‍यास त्‍यास प्रशासन जबाबदार राहील.

या निवेदनावर आनंद नरसाळे, संजय वारंग, विष्‍णू झगडे, सुहास पाताडे, जयवंत वारंग, सुरेश मोरे, वसंत वारंग, मधुकर कांबळे, विद्याधर वारंग, सुरेश जाधव, महेंद्र तेली, संभाजी तेली, दीपक पाताडे, विजय तेली, महादेव जाधव, संतोष मोरे, चंद्रकांत वारंग, प्रकाश वारंग, महेश वारंग, राजेंद्र वारंग, विजय राणे, मंगेश वारंग, चंद्रकांत वारंग, दीपक वारंग, सुमती दुखंडे, धोंडू पाताडे, एकनाथ वारंग, संजय पेडणेकर, सुधाकर पेडणेकर, रमेश गावकर, संतोष गावकर, सुनील वारंग, वैभव सावंत आदींनी सह्या केल्‍या आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा