साटम महाराजांच्या जयंतीनिमित्त उद्या दाणोली येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी :
कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली येथील साटम महाराजांचा जयंती उत्सव अक्षय तृतीयेच्या सुवर्ण पर्वणीला शुक्रवार १० मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालिन असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते.
यानिमित्त समाधी मंदिरात पहाटे ५ वाजता काकड आरती, पहाटे ५:१५ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ८ वाजता साटम महाराज समाधी पूजन व विधिवत पाद्यपूजा दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंत भोसले यानी केले आहे.