You are currently viewing चर्मकार समाजाच्या भवनासाठी आमदार निधी देणार- आ. वैभव नाईक

चर्मकार समाजाच्या भवनासाठी आमदार निधी देणार- आ. वैभव नाईक

भारतीय चर्मकार समाजाचा ओरोस येथे भव्य स्नेहमेळावा संपन्न

चर्मकार समाजाचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच चर्मकार समाजाच्या भवनासाठी माझा आमदार निधी दिला जाईल असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भारतीय चर्मकार समाजाच्या भव्य स्नेहमेळावा व सत्कार सोहळ्यात ओरोस येथे केले. स्नेहमेळाव्यात समाजाच्या विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्याचा गौरव सोहळा महिलांचा गौरव सोहळा मोफत आरोग्य शिबीर विविध पुरस्कारप्राप्त यांचा सन्मान आदी भरगच्च सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते


भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र संघटनेला 34 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी सन्मान व विशेष सन्मान सोहळा तसेच मोफत आरोग्य शिबीर कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांचे अध्यक्षतेखाली श्री रवळनाथ मंदिर रंगमंच, ओरोस येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक ,शिवसेना नेते संदेश पारकर भारतीय चर्मकार समाज राज्य अध्यक्ष, श्री. पंढरी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


यावेळी तानाजी परब. अरुण होडावडेकर बाबा गवळी जिल्हाअध्यक्ष बाबल नांदोसकर राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण कार्याध्यक्ष अनिल चव्हाण सुरेश चौकेकर उद्योजक बाबल पावसकर संजय निवळकर विनायक कोडल्याळ स्नेहा दळवी विश्वनाथ चव्हाण भारत पेंडुरकर सी आर चव्हाण मालिनी चव्हाण प्राजक्त चव्हाण डॉ प्रतीक्षा चव्हाण सहदेव चव्हाण रघुनाथ चव्हाण मंगेश चव्हाण अंकुश चव्हाण सहदेव चव्हाण केशव पिंगुळकर गणेश चव्हाण संजय कुडाळकर तुळशीदास पवार प्रभाकर चव्हाण नंदकिशोर तेंडोलकर उमेश चव्हाण केशव चव्हाण प्रशांत तेंडुलकर गणपत चव्हाण रमेश कुडाळकर श्याम चव्हाण सत्यवान खोटलेकर अनिल जाधव प्रथमेश नांदोसकर सुनील रेडकर मिलिंद होडावडेकर सुनील केळकर डॉ जगदीश्वर तेडोलकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई कोल्हापूर रत्नगिरी पालघर आदी भागातून समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होता विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले आज समाजाच्या मेळाव्यात लक्षणीय सहकुटुंब उपस्थिती बघायला मिळाली अशा प्रकारच्या उपस्थितीची आज प्रत्येक समाजाला गरज आहे चर्मकार समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तुमचा हक्काचा आमदार म्हणून काम करणार शिवाय समाजाचे भव्य भवन होण्यासाठी माझा आमदार निधी देणार असल्याचे जाहीर केले समाजाचे राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण हे राज्य पातळीवर समाज संघटना बांधणीचे फार मोठे काम करत आहेत त्यांना तुमची सर्वाची अशीच साथ मिळावी असे सांगितले.
संदेश पारकर म्हणाले, आजच्या मेळाव्यात समाजाची मजबुत ताकत दिसली विविध क्षेत्रात या समाजाची माणसे आहेत हे समाजासाठी भूषण आहे आपण समाजात वावरताना समाजाचे देणे लागतो ही भावना जोपासून काम करावे महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे महिला ही सुद्धा समाजाच्या प्रवाहातआली पाहीजे असे सांगत आमचे नेतृत्व आपल्या समाजाच्या पाठीमागे उभे राहील समाजात दुफळी असता कामा नये असे सूचित केले.
राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण म्हणाले भारतीय चर्मकार समाजाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी कटिबद्ध होणे काळाची गरज आहे कोणत्याही क्षेत्रात काम करताना संघटना फार महत्त्वाची आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय चर्मकार समाज नेहमीच कार्यरत राहिला आहे समाजासाठी विविध उपक्रम राबविले आहेत भारतीय चर्मकार समाज ही राज्य पातळीवरील संघटना असून सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी काम करते तसेच शासनाच्या ज्या योजना आहेत त्या समाजापर्यंत कशा पोचविता येतील या दृष्टीने कार्यरत राहून नेहमी समाजासाठी काम करा भविष्यात विविध उपक्रम हाती घेऊन वाटचाल करावी असे आवाहन केले


जिल्हा अध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी तुमच्या ताकदीवरच हा मेळावा आपण यशस्वी केला आहे भविष्यात समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले चंद्रकांत चव्हाण सुरेश चौकेकर अरुण होडावडेकर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आरोग्य शिबिराने कार्यक्रमाची सुरुवात झाली या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सन 2021 ची संत शिरोमणी रविदास दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली इयत्ता १० वी, १२ वी, पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच नवोदय परीक्षेत निवड झालेले शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी व ८ वी ) उत्तीर्ण, डॉक्टर ,इंजिनियर व वकिली परीक्षा उत्तीर्ण अगर इतर उच्च दर्जाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला समाजातील बचत गटांच्या 400 हुन अधिक महिला व इतर वर्गातील महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला उल्लेखनीय काम करणाऱ्याचा समाज बांधवांचा विशेष पुरस्कार सन्मान सोहळा तसेच समाजातील कोरोना काळात विशेष काम केलेल्या योध्दाचा सन्मान असा भरगच्च कार्यक्रम दिमाखात पार पडला कोरोना संकटाच्या अनुषंगाने कार्यकर्ते अंकुश चव्हाण यांच्या सौजन्याने उपस्थिताना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 13 =