विलवडेत दुचाकीवरून पडून महिलेचा मृत्यू
बांदा
बांदा – दाणोली मार्गावर दुचाकीवरून पडल्याने असनिये येथील महिला मयत झाल्याची घटना आज सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. शितल सीताराम सावंत (५२, सध्या रा. विलवडे फौजदारवाडी) असे तीचे नाव आहे. सकाळी मोपा विमानतळावर कामासाठी दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली. जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी तिला डॉक्टरांनी मयत घोषित केले. विलवडे जांभळ बसस्टॉपवर ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शितल सावंत या चार दिवसांपूर्वीच मोपा विमानतळावर नोकरीवर रुजू झाल्या होत्या. आज सकाळी अज्ञाताच्या दुचाकीने बांद्याकडे येत असताना जांभळं बसस्टॉप वर त्यांचा तोल जाऊन खाली कोसळल्या. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.